
हे म्युझियम म्हणजे ज्ञान, संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा आविष्कार:खासदार डॉ.अमोल कोल्हे
पंचनामा बेल्हे प्रतिनिधी – समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित,समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट,बेल्हे या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक्स म्युझियम लॅब चे उद्घाटन संसदरत्न खासदार डॉ.अमोल कोल्हे व माजी आमदार अतुल बेनके यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील इतिहास,प्रगती आणि नवकल्पना यांची प्रत्यक्ष माहिती मिळावी या उद्देशाने हे म्युझियम उभारण्यात आल्याचे प्राचार्य डॉ.नवनाथ नरवडे यांनी सांगितले.
उद्घाटनानंतर उपस्थित प्राध्यापक,शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांसमवेत इलेक्ट्रॉनिक्स म्युझियमची पाहणी केली.या म्युझियममध्ये इलेक्ट्रॉनिक च्या मूळ संकल्पना,कॅपॅसिटर,रेसिस्टर,ट्रांजिस्टर,किज यापासून तयार केलेले सर्किट व त्याची कार्यप्रणाली कशी चालते याचे प्रदर्शन मांडण्यात आलेले होते. इलेक्ट्रॉनिक्स विषयी फारशी माहिती नसणारा देखील हे प्रदर्शन पाहिल्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स विषयी कुतूहल निर्माण होईल असे हे म्युझियम असल्याचे यावेळी माजी आमदार अतुल बेनके यांनी सांगितले.
यावेळी खासदार अमोल कोल्हे यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत आधुनिक तंत्रज्ञान,नवकल्पना,संशोधन आणि भविष्यातील करिअरच्या संधी यावर सखोल चर्चा केली.विद्यार्थ्यांनी मांडलेले विचार,कल्पना आणि प्रश्न ऐकून त्यांचा उत्साह व जिज्ञासा निश्चितच प्रेरणादायी ठरेल.कार्यक्रमादरम्यान गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या मेहनतीचे मनापासून कौतुक केले.हे इलेक्ट्रॉनिक्स म्युझियम केवळ एक दालन नसून,तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञान,संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या नव्या संधी उघडणारे केंद्र ठरेल,असा विश्वास यावेळी संसदरत्न खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला.
“इलेक्ट्रॉनिक्स हे आजच्या काळातील अत्यंत वेगाने विकसित होणारे क्षेत्र आहे.अशा म्युझियममुळे विद्यार्थ्यांना जुन्या ते आधुनिक उपकरणांचा प्रवास समजेल आणि संशोधनाची प्रेरणा मिळेल.”विद्यार्थ्यांनी नवतंत्रज्ञान आत्मसात करून देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे,असे आवाहन यावेळी केले.
या म्युझियममध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकमुनिकेशन इंजीनियरिंग विभागाचे प्रमुख प्रा.निर्मल कोठारी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांमार्फत विविध उपकरणे,आधुनिक सर्किट बोर्ड,मायक्रोप्रोसेसर,विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे मॉडेल्स तसेच माहितीफलकांची सुबक आणि आखीव रेखीव मांडणी करण्यात आली आहे.नवीन तंत्रज्ञानाला व्यवहारिकतेची जोड देऊन सहजपणे समजतील अशा संज्ञांचे स्पष्टीकरण फलकाद्वारे त्याचप्रमाणे डेमो आणि मॉडेलच्या च्या माध्यमातून सादर करण्यात आलेले होते.
हे म्युझियम तयार करण्यासाठी विभाग प्रमुख प्रा.निर्मल कोठारी,प्रा.सुचिता साबळे,प्रा.दिपाली गडगे,प्रा.प्रियांका पोटफाडे,यांच्यासह सार्थक देशमुख,वेद कढणे,आदित्य चौधरी,प्रज्वल चौधरी,साहिल खरगे,यश गुंजाळ या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके,अशोक घोडके,एमडी घंगाळे साहेब जानकुशेठ डावखर,प्रदीप पिंगट,जी के औटी सर,मनीषाताई डावखर,लहू गुंजाळ,ज्ञानेश्वर गटकळ,एमडी घंगाळे साहेब,नरेंद्र गटकळ,अशोक शेठ औटी,सुरेश शेठ बोरचटे,विश्वनाथ डावखर,मोहन शेठ नाईकवाडी,विनायक आहेर,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,समर्थ कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट चे प्राचार्य डॉ.नवनाथ नरवडे,समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.कुलदीप रामटेके समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले,समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्सचे प्राचार्य डॉ.उत्तम शेलार,डॉ.लक्ष्मण घोलप, प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदिप गाडेकर तसेच संकुलातील सर्व प्राचार्य,विभागप्रमुख,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
