सामाजिक

समर्थ आय.टी.आय बेल्हे च्या ६३ विद्यार्थ्यांची बजाज ऑटो कंपनी मध्ये ऑन जॉब ट्रेनिंगसाठी निवड !!

img 20260214 wa0509

पंचनामा बेल्हे प्रतिनिधी – समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित,समर्थ औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), बेल्हे येथील विविध ट्रेड्समधील एकूण ६३ विद्यार्थ्यांची बजाज ऑटो लि.चाकण या कंपनीमध्ये ऑन जॉब ट्रेनिंग (OJT) साठी निवड झाल्याची माहिती उपप्राचार्य विष्णू मापारी यांनी दिली.
या निवडीमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योगातील कामाचा अनुभव मिळणार असून त्यांच्या कौशल्यविकासाला मोठी चालना मिळणार आहे.

औद्योगिक प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून राबविण्यात येणाऱ्या ऑन जॉब ट्रेनिंगमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक यंत्रसामग्री,उत्पादन प्रक्रिया,सुरक्षितता नियम तसेच कार्यसंस्कृती यांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे.प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोजगाराच्या संधी अधिक व्यापक होणार असल्याचे मत प्राचार्य पांडुरंग हाडवळे यांनी व्यक्त केले.

img 20260213 wa0495

समर्थ आय टी आय सातत्याने गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण,उद्योगसंलग्न उपक्रम आणि रोजगाराभिमुख उपक्रम राबवित असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये नेहमीच अग्रेसर असते.विद्यार्थ्यांनी मिळालेल्या संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा.शिस्त व कौशल्य आत्मसात करून उद्योगविश्वात संस्थेचे नाव उज्वल करावे असे आवाहन संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके सर यांनी केले.

बजाज ऑटो लि. चाकण यांच्या वतीने गणेश जाधव,प्रशांत मगर,प्रथमेश देसाई,गणेश खुटवळ यांनी योग्य प्रशिक्षणार्थींची निवड केली.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके सर,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर राजीव सावंत यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

निकेश औटी,विलास सोनवणे,महेंद्र न्हावी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष योगदान दिले.

Related posts

पहिल्या टप्यात पुणे जिल्ह्यातील ३८ हजार ९७० शेतकऱ्यांची कर्जमुक्ती; ३४५.२५ कोटीचा दिलासा !!

Chief Editor

युक्‍ती 2.0 स्टार्टअप आयडियाथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद; ७६ संघांचा सहभाग !!

Chief Editor

आंबेगावच्या पूर्व भागात पारंपरिक पद्धतीने गणरायाचे आगमन !!

Chief Editor

Leave a Comment