सामाजिक

इतर मागासवर्गीयांसाठी स्वयंरोजगार व उच्च शिक्षणासाठी विविध कर्ज योजना; ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन !!

1010187393

पंचनामा प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत इतर मागासवर्गीय प्रवर्गातील पात्र नागरिकांना स्वयंरोजगार, उद्योग व्यवसाय आणि उच्च शिक्षणासाठी विविध कर्ज व व्याज परतावा योजनांचा लाभ उपलब्ध करून दिला जात आहे. पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

महामंडळामार्फत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (१५ लाख रुपयांपर्यंत), गट कर्ज व्याज परतावा योजना (१० ते ५० लाख रुपये), महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना (५ ते १० लाख रुपये), शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना (देशांतर्गत १० लाख व परदेशी शिक्षणासाठी २० लाख रुपये) तसेच १ लाख रुपयांपर्यंतची थेट कर्ज योजना राबविण्यात येत आहे.

पात्र लाभार्थ्यांनी बँकांकडून मंजूर झालेल्या कर्जावरील व्याज परतावा योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

इच्छुकांनी www.msobcfdc.org⁠ या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा.

अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी, येरवडा, पुणे येथे अथवा दूरध्वनी क्रमांक ०२०-२९५२३०५९ वर संपर्क साधावा, असे आवाहन महामंडळामार्फत करण्यात आले आहे.

1009850407

Related posts

राष्ट्रीय क्विझ स्पर्धेत “समर्थ फार्मसी” च्या रुचा कोरडेचे नेत्रदीपक यश२०० विद्यार्थ्यांवर मात करत पटकावले विजेतेपद; २५ पैकी २५ गुणांची कमाई, अवघ्या ४ मिनिटे १५ सेकंदांत प्रश्नमंजुषा पूर्ण !!

Chief Editor

समर्थ फार्मसी,बेल्हे मध्ये राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा उत्साहात संपन्न !!

Chief Editor

निरगुडसर येथील बेटवस्ती-कारवस्ती येथे श्री मुक्तादेवी भंडारा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न !!

Chief Editor

Leave a Comment