आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व लाईफ ग्रीन क्लास यांच्या संयुक्त विद्यमाने “फिरती प्रयोगशाळा” या उपक्रमांतर्गत विज्ञानाच्या मूलभूत प्रयोगाचे सादरीकरण समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे (बांगरवाडी) येथे करण्यात आले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व लाईफ ग्रीन क्लास यांच्या संयुक्त विद्यमाने “फिरती प्रयोगशाळा” या उपक्रमांतर्गत विज्ञानाच्या मूलभूत प्रयोगाचे सादरीकरण समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे (बांगरवाडी) येथे करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके, सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,पिंपरी चिंचवड सायन्स पार्क चे प्रमुख सुनील पोटे,एम बी ए चे प्राचार्य प्रा.राजीव सावंत,समर्थ पॉलिटेक्निक चे प्राचार्य अनिल कपिले,समर्थ ज्युनिअर कॉलेज च्या प्राचार्या वैशाली आहेर,समर्थ गुरुकुल चे प्राचार्य सतीश कुऱ्हे,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर आदि मान्यवर उपस्थित होते.
फिरती विज्ञानवाहिनी चे समन्वयक डॉ.संजय ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली नंदराज कोळेकर,गणेश सोनवणे,निशांत जगताप,रवी मगर,राहुल जगताप,सोमनाथ मुर्तडक या सहऱ्यांनी विज्ञानविषयक विविध प्रयोगांची प्रात्यक्षिके दाखविली.
प्रथम सत्रामध्ये लिक्विड नायट्रोजन शो दरम्यान सजीव आणि निर्जीव गोष्टीवरील प्रयोग सदर केले.तसेच विज्ञानावर आधारिक एक नाटिका सर्व विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली.
या नाटिकेमध्ये नॅनो पार्टिकल पावडर,विज्ञानावर आधारित अनेक प्रयोग दाखवले गेले.
दुसऱ्या सत्रामध्ये
मागलेव पेन्सिल,प्लाझ्मा प्रयोग,सॉल्ट वॉटर बॅटरी,डी सी मिटर,सोलर कुकर असे असंख्य प्रयोग विद्यार्थ्यांना अनुभवायला मिळाले.विज्ञान प्रश्नांमंजुषे दरम्यान विद्यार्थ्यांना व्यासपीठावर बोलावून बरोबर उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना विज्ञान प्रयोग संच भेट देण्यात आला.
या कार्यक्रमासाठी समर्थ शैक्षणिक संकुलातील विविध महाविद्यालयांतून विज्ञान शिकणाऱ्या सुमारे १२०० विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रामचंद्र मते यांनी तर आभार प्राचार्य सतीश कुऱ्हे यांनी मानले.

 

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.