विद्या मंदिर सडोली दुमाला शाळेत आपुलकी सेवाभावी संस्था कागल मार्फत शैक्षणिक साहित्य वाटप !!


विद्या मंदिर सडोली दुमाला शाळेत आपुलकी सेवाभावी संस्था कागल मार्फत शैक्षणिक साहित्य वाटप !!
पंचनामा प्रतिनिधी – आपुलकी सेवाभावी संस्था कागल ही जिल्ह्यातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तूंचे वाटप करणारी संस्था आहे.या संस्थेने आज अखेर अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत सुद्धा केली आहे.
विद्या मंदिर सडोली दुमाला या शाळेमधील गरजू होतकरू विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व सर्वच विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.
या शैक्षणिक वस्तूंचे वाटप सडोली गावचे लोकनियुक्त सरपंच श्री.अभिजीत पाटील, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.माणिका भोसले,उपाध्यक्ष श्री. अशोक कांबळे, सारिका देसाई, समन्वयक श्री.एम.आर.कांबळे, अतुल कांबळे,भाऊसाहेब भोसले,विक्रम चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
आपुलकी सेवाभावी संस्थेचे उपाध्यक्ष श्री.सत्यजित इंगवले व विजय पाटील यांनी संस्थेच्या विविध योजनांची माहिती विशद केली.
अध्यक्ष तुषार भास्कर यांच्या प्रयत्नातून यापुढेही शाळेला शैक्षणिक वस्तूंची मदत करण्याचे वचन त्यांनी दिले.या मान्यवरांचे स्वागत व सत्कार शाळेचे मुख्याध्यापक श्री.एकनाथ कुंभार यांचे हस्ते करण्यात आला. अद्यापिका श्रीमती सुरेखा नलवडे यांनी आपुलकी संस्थेच्या कार्याचा गौरव व कौतुक केले. भाऊसो भोसले यांनी जून पासून शाळेमध्ये राबवलेल्या विविध सहशालेय उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली.
स्वागत श्रीमती विठाबाई कांबळे यांनी तर आभार श्री महादेव खोंद्रे यांनी मानले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यापक चंद्रकांत थोरवत,भीमराव पाटील, अश्विनी पोवार,योगिता निकम यांनी विशेष प्रयत्न केले.
