प्रीतम ज्येष्ठ नागरिक आनंदशाळा– जेष्ठ नागरिक व गरजू महिलांसाठी इलेक्ट्रिक रिक्षाने मोफत प्रवास सेवा सुरू.


पंचनामा सांगली प्रतिनिधी- प्रीतम ज्येष्ठ नागरिक आनंदशाळा यांच्या वतीने जेष्ठ नागरिक व गरजू महिलांसाठी महानगरपालिका हद्दीत मोफत प्रवास योजना राबवण्यात येत असून, शुक्रवार, 4 जुलै रोजी या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. महानगरपालिका हद्दीत आता इलेक्ट्रिक रिक्षाद्वारे मोफत प्रवासाची सुविधा देण्यात येणार आहे.
या उपक्रमाचा शुभारंभ मा. उपायुक्त श्रीमती स्मृती पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांनी सांगितले की, पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन देत जेष्ठ व गरजू नागरीकांच्या सन्मानासाठी ही सेवा प्रीतम ज्येष्ठ नागरिक आनंद शाळा यांच्यावतीने सुरू करण्यात आली आहे.
या उपक्रमामुळे अनेक जेष्ठ व गरजू महिलांना दररोजच्या सुखद प्रवासा साठी मोठा दिलासा मिळणार आहे.
सर्व जेष्ठ नागरिक व गरजू महिलांनी या मोफत प्रवास सुविधेचा लाभ घ्यावा अशी नम्र विनंती श्री अभिनय जगन्नाथ कामाजी यांच्यावतीने करण्यात आली आहे.
