अजमेळा दिंडीची पंढरीला प्रदक्षिणा!!


पंचनामा अवसरी प्रतिनिधी – आदर्श गाव गावडेवाडी (ता आंबेगाव) येथील अजमेळा दिंडी क्रमांक 26 च्या वतीने एकादशी आषाढी एकादशीचे निमित्त साधून पंढरीला प्रदक्षिणा काढण्यात आली.या प्रदक्षिणेत शेकडो वारकरी सहभागी झाले होते.ज्ञानोबा तुकाराम पुंडलिकावरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम या जय घोषात ही प्रदक्षिणा काढण्यात आली.
या प्रदक्षिणेत चोपदार मधुकर साळवे,माधव वाघमारे,राजू दिवटे, सोनबा पंचरास,महिला सविता गायकवाड, राधाबाई पवार,कौसाबाई टाव्हरे,संदीप जाधव,हरणाबाई टाव्हरे, सागर पाटोळे,बाळू पुरवले,राजेंद्र जठार, ऋग्वेद आहेर,सविता आहेर व अनेक मान्यवर मंडळी सहभागी झाली होती.

प्रदक्षिणा मार्गावर दिडींवर पुष्पवृष्टी करण्यात आली.चंद्रभागेमध्ये भारुडाचार्य अशोक सकट यांचे भारुड संपन्न झाले.फुगड्या खेळून महिला भाविकांनी आनंद साजरा केला.दिंडी प्रदक्षिणेमध्ये प्रत्येक देवापुढे अभंग म्हणून देवांची आराधना करण्यात आली.या दिंडी प्रदक्षिणेत मोठ्या संख्येने वारकरी सहभागी झाले होते अशी माहिती ह.भ.प.पत्रकार मधुकर महाराज गायकवाड यांनी दिली.