आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

न्यू इंग्लिश स्कूल जांभोरी विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील जयंती मोठया उत्साहात साजरी !!

पंचनामा डिंभे प्रतिनिधी – आदिवासी दुर्गम भागातील न्यू इंग्लिश स्कूल जांभोरी येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३८ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

जांभोरी (ता.आंबेगाव) येथे न्यू इंग्लिश स्कूल मध्ये प्रतिमेचे पूजन जांभोरी गावच्या लोकनियुक्त सरपंच सुनंदाताई पारधी, उपसरपंच बबन केंगले, ग्रामपंचायत सदस्या लताबाई केंगले, जांभोरी गावचे पोलीस पाटील नवनाथ केंगले, माजी सरपंच नारायण पारधी,युवानेते मारुती केंगले, बिरसा ब्रिगेड शाखा जांभोरीचे अध्यक्ष सुनिल गिरंगे, टल्लू केंगले, सुभाष केंगले या मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

जांभोरी ते माचीचीवाडी अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली. या प्रसंगी लेझिम पथक व ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक श्री काळू केंगले सर, श्री चव्हाण सर, सहशिक्षक श्री मोरे सर, शिपाई किसन केंगले यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मविभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे जीवनावर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांना कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विषयी माहिती युवानेते मारुती केंगले यांनी सांगितली.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार श्री मोरे सर यांनी मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.