आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजन

कळस येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्री.शंकर जाधव तर उपाध्यक्षपदी सौ.सोनाली हुलवळे

पंचनामा अकोले प्रतिनिधी – तालुक्यात शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या कळस बु.जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शंकर जाधव व उपाध्यक्षपदी सोनाली हुलवळे यांची निवड झाली आहे.

कळस शाळेत शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अध्यक्ष पदासाठी शंकर जाधव यांची निवड पद्धतीने तर उपाध्यक्षपदासाठी सोनाली हुलवळे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

या बैठकीसाठी ग्रामपंचायत सदस्य जिजाबा वाकचौरे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष नामदेव निसाळ, सदस्य सुरेश वाकचौरे, गोविंद ढगे, अनिल वाकचौरे, सौ. मनिषा बोऱ्हाडे, विलास कातोरे, मंगल ढगे, सीमा खताळ, मनिषा चौधरी, जिजा गवांदे, अफिका सय्यद आदी उपस्थित होते.

शाळेचे मुख्याध्यापक तान्हाजी वाजे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले
या निवडीचे जीप चे माजी सभापती कैलासराव वाकचौरे, सोन्याबापू वाकचौरे, अगस्ती साखर कारखान्याचे संचालक सीताराम वाकचौरे, कळस चे सरपंच राजेंद्र गवांदे, सोसायटी चेअरमन विनय वाकचौरे, जयकिसान दूध संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब वाकचौरे, संगमनेर साखर कारखान्याचे संचालक अरुण वाकचौरे, अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ईश्वर वाकचौरे, उपसरपंच केतन वाकचौरे, माजी संचालक संभाजी वाकचौरे, कळसेश्वर विद्यालय शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोरख वाकचौरे,शिवसेना नेते रावसाहेब वाकचौरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभात चौधरी यांनी अभिनंदन केले आहे.

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.