कु.श्रीनव गिरे, सिद्धार्थ साठे सलाम तुमच्या प्रामाणिकपणाला


पंचनामा पुणे प्रतिनिधी – गुलटेकडी मार्केट यार्डच्या परिसरात हरवलेला मोबाईल फोन कु.श्रीनव गिरे, सिद्धार्थ साठे या दोन विद्यार्थांनी प्रामाणिकपणाने मूळ मालकाला परत केला आहे.
याबाबत घडलेली हकीकत अशी, वारकरी गणेश भागवत हे पंढरीच्या वारीसाठी मार्गस्थ झालेले आहेत. सध्या त्यांचा मुक्काम पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्ड येथे आहे. दोन दिवसापूर्वी त्यांनी २३,५००/- रुपयांची व्हीवो कंपनीचा मोबाईल खरेदी केला होता. गुलटेकडी परिसरात फिरत असताना त्यांचा मोबाईल हरवल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पारगावचे मा.उपसरपंच विठ्ठल ढोबळे यांच्या मोबाईल वरून फोन केला मात्र खूप वेळ झाला तरी फोन उचलला गेला नाही. थोड्या वेळाने फोन लावल्यावर श्रीनव गीरे याने फोन उचलून आम्हाला फोन सापडला असल्याचे सांगितले. आम्हाला पत्ता सांगा आम्ही फोन घेऊन येतो असे सांगितले. थोड्याच वेळात दिलेल्या पत्त्यावर श्रीनव गीरे व सिद्धार्थ साठे हे मोबाईल घेऊन आले
या दोन्ही विद्यार्थ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करून ढोबळे सरपंच यांनी मोबाईल मूळ मालकाला परत केला.तसेच दोघांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करून त्यांना रोख बक्षिस देऊन भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी गणेश भागवत,गणेश टावरे, ह.भ.प.निवृत्ती महाराज लोखंडे, रामभाऊ कदम, सुभाष रोडे, बाळासाहेब येलभर उपस्थित होते.
