आयुष्यामध्ये एकदा तरी वारीचा अनुभव घ्यावा – ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली कदम (छोटे माऊली)

राजुरी मध्ये कृतज्ञता सोहळा संपन्न !!

पंचनामा राजुरी प्रतिनिधी – जगद्गुरु तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदेह वैकुंठ गमन सांगता सोहळा ओतुर या ठिकाणी अत्यंत आध्यात्मिक वातावरणात यशस्वी केल्याबद्दल गुरूवर्य ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली कदम (छोटे माऊली) यांचा राजुरी,उंचखडक,आबाटेक ग्रामस्थांच्या वतीने कृतज्ञता सोहळा नुकताच राजुरी येथे आयोजित करण्यात आला होता.
समस्त ग्रामस्थ राजुरीकरांच्या वतीने यावेळी ह भ प ज्ञानेश्वर महाराज कदम (छोटे माऊली) यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला.त्याचबरोबर ओतूर येथे पार पडलेल्या कृतज्ञता सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या सर्वच मान्यवरांचा राजुरीकरांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी माजी आमदार अतुलशेठ बेनके,जिल्हा दुध संघाचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक बाळासाहेब खिल्लारी,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मोहित ढमाले,स्नेहल शेळके,पंचायत समितीचे माजी सदस्य नेताजी डोके,गावच्या सरपंच प्रिया हाडवळे,उपसरपंच माऊली शेळके,एम.डी.घंगाळे,वल्लभ शेळके,गंगाराम डुंबरे,बाळासाहेब औटी,जयचंद जुंदरे,बाळासाहेब गायकर,विनायक तांबे,बाबाजी शिंदे,गोविंद औटी,अशोक घोडके,प्रियंका दाते,गोरक्ष हाडवळे,मुरलीधर औटी,बी.टी.डुंबरे,जयसिंग औटी,जाणकु डावखर,लहू गु़जाळ,दिलीप घंगाळे,विनोद औटी आदी मान्यवर तसेच जुन्नर तालुक्यातील विविध गावचे सरपंच,उपसरपंच,ग्रामस्थ उपस्थित होते.
किर्तनरुपी सेवेमध्ये उपस्थितांना मार्गदर्शन करताना ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज कदम (छोटे माऊली) यांनी पंढरपूर तीर्थक्षेत्राचे महत्त्व विशद करून वारी का करावी याबद्दल सखोल मार्गदर्शन केले.महाराष्ट्र ही संतांची भूमी असून महाराष्ट्रातील संतपरंपरेचे महत्त्व व व्याप्ती सांगत वारकरी संप्रदाय हा सर्वश्रेष्ठ संप्रदाय असून भेद,भाव,भ्रम भक्ती-भेद निर्मूलनासाठी वारकरी संप्रदायामार्फत सध्या सुरू असलेल्या कार्याबाबत मार्गदर्शन केले.छोटे माऊली म्हणाले की,वारकरी संप्रदायाची पताका हातात घेऊन सर्वतोपरी कार्य करण्यासाठी युवकांनी पुढाकार घेऊन वारकरी संप्रदायाची पताका तेवत ठेवावी हीच खरी अध्यात्माची ताकद आहे. आयुष्यामध्ये प्रत्येकाने एकदा तरी वारीचा अनुभव घ्यावा.
वारकरी संप्रदायाचे काम फार मोठे असून समाजाला दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन माजी आमदार अतुल बेनके यांनी केले.
यावेळी ह भ प छोटे माऊली यांच्या कीर्तन रुपी सेवेसाठी भाविकांना येण्यासाठी विविध विभागातून बसची सेवा देखील उपलब्ध करून देण्यात आलेली होती.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जी के औटी यांनी केले तर आभार संजय औटी यांनी मानले.
