वडगावपीर (ता.आंबेगाव) येथे शनिवार दि.२२ मार्च २०२५ ते सोमवार दि.२४ मार्च २०२५ या कालावधीत श्री पिरसाहेब यात्रा उत्सवाचे आयोजन!!

वडगावपीर (ता.आंबेगाव) येथे शनिवार दि.२२ मार्च २०२५ ते सोमवार दि.२४ मार्च २०२५ या कालावधीत श्री पिरसाहेब यात्रा उत्सवाचे आयोजन!!
हिंदू-मुस्लिम बाधवांचे श्रद्धास्थान!!
हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या वडगावपीर (ता.आंबेगाव ) येथील श्री पिरसाहेब यात्रा उत्सव शनिवार (दि.२२) ते सोमवार (दि.२४ )असे तीन दिवस संपन्न होणार आहे.
शनिवार ( दि.२२) रोजी सांयकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत संदल कार्यकम होणार असून या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हिंदू-मुस्लिम बांधव उपस्थित असतात असे हजरत दावल मलिक दर्गा शरिफ ट्रस्टिजच्या वतीने हनिक मुजावर यांनी सांगितले आहे.
रविवार (दि.२३ ) रोजी सकाळी ८ वाजता देवास शेरणी,दंडवते,शेरणी वाटप तसेच सकाळी सात ते सायंकाळी सात वाजता बैलगाड्याच्या भव्य शर्यती संपन्न होणार आहेत. त्यासाठी गुरुवार (दि.२०) रोजी ९ ते १२ वाजता लकी ड्रॉ पध्दतीने टोकन काढले जातील.
बैलगाड्यांसाठी एकूण इनाम ३,५१,९००/- रुपये असून, प्रथम क्रमांकासाठी ७५,५५५/- रुपये, द्वित्तीय क्रमाक-६५,५५५/- रुपये, तृत्तीय क्रमाक-५५,५५५/- रुपये, चतूर्थ क्रमाक-३५,५५५/- रुपये, इनाम असून, फायनलसाठी प्रथम क्रमांक-३१,००१/- रुपये,द्वित्तीय क्रमाक-२१,१०१/- रुपये,तृतीय क्रमांक-११,००१/ रुपये, चतुर्थ क्रमांक ९,००१/- पाचवा क्रमांक ७,००१/- घाटाचा राजा ११,१११/- रुपये,वीस फूटावर कांडे-५,५५५/- रुपये तसेच पहिल्यात पहिला येणा-या गाड्यास -९००१/- रुपये, दुसर्यात पहिला येणार्या गाडयास-७००१/- रुपये, तिसर्यात पहिल्या येणार्या गाडयास-५००१/- रुपया,चौथ्यात पहिला येणार्या गाडयास-३००१/- रुपये अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.तसेच सतत तीन वर्ष प्रथम येणाऱ्या गाड्यास (सन २०२४ ते २०२६) गाड्यास ५ दुचाकी किंवा रोख रक्कम रुपये ३,५१,००१/- रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. तसेच आकर्षक गाडा बारीसाठी १५०१ /- रूपये बक्षिस ठेवले आहे.
रविवार (दि.२३) रोजी रात्री ९ वाजता संगिताची राणी मंगला बनसोडे सोबत नितीनकुमार बनसोडे करवडीकर यांचा लोकनाटय तमाशाचा कार्यक्रम होईल. सोमवार (दि.२४) रोजी दुपारी ४ ते ७ वाजेपर्यंत भव्य कुस्त्यांचा जंगी आखाडा होईल.या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहाणार आहेत.या सर्व कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन समस्त ग्रामस्थ वडगावपीर-मांदळेवाडी,मुंबई,पुणे व शिवछत्रपती ग्रामविकास प्रतिष्ठान व सर्व मंडळे यांनी केले आहे असे ग्रामस्थांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.