आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

नातेकलेचे त्या रक्ताशी!! या लेखमालेचे आजचे आकर्षण… कै.विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांची नात आवाजाची जादू, गायिका, लावणी सम्राज्ञी ,लक्ष्मीताई नारायणगावकर

साभार लेख - शाहीर खंदारे

अखंड महाराष्ट्रातील कलेवर प्रेम करणाऱ्या रसिकांना त्रिवार मानाचा मुजरा!!

नातेकलेचे त्या रक्ताशी!! या लेखमालेचे आजचे आकर्षण… कै. विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांची नात आवाजाची जादू, गायिका, लावणी सम्राज्ञी ,लक्ष्मीताई नारायणगावकर तालुका जुन्नर ,जिल्हा पुणे होय.

लक्ष्मीताईच्या आईचे नाव भारतीबाई असे आहे. लक्ष्मी ताई चे शिक्षण 9 वी पास असून, तिला दोन मुलं आहेत. लक्ष्मीताई तेरा वर्षाचीच असताना कलेचा छंद लागला. तिच्या अंगामध्ये हात, पाय हलवण्याची व संगीतावर अदाकारी करण्याची कला अवगत झाली होती.

लक्ष्मी ताईला सौ.मंगलाताई बनसोडे आणि मालती ताई इनामदार या दोन मावशींनी चांगलेच डान्स करण्याचे शिक्षण दिले . अदाकारी शिकवली,आता लक्ष्मीताई चांगलीच तरबेज झाली होती. नंतर लक्ष्मीताईने सौ मंगलाताई बनसोडे, सौ मालती ताई इनामदार, (कलाभूषण) रघुवीर खेडकर, कै. विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर या नामवंत तमाशा फडांत काम करून महाराष्ट्रात नाव गाजविले.

गणगवळण , आणि फारश्यात, बोलपटाचे काम चांगल्या करतात . खरंच त्या अष्टपैलू कलावंत आहेत. शिवाय त्या वगनाट्यातही काम करु लागल्या. त्यांनी लग्नाआधी कुंकू पुसले , माहेरची साडी, मुंबईची केळेवाली, रक्तात न्हाली कुऱ्हाड, शेवटी मला जीव लावा इत्यादी वगनाट्यात काम केले. कै विठाबाई यांची सुप्रसिद्ध लावणी म्हणजे “पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची” ही लावणी सध्या लक्ष्मीताई ने गाऊन आपल्या अदाकारीने व आवाजाने रसिकांच्या ओठावर कायमची ठेवली आहे. ही लावणी गाताना लक्ष्मीताई नऊवारी साडी, हात भरून बांगड्या , दंडापर्यंत चोळी, केसाचा अंबाडा, कपाळी कुंकू, पायात घुंगरू, नाकात नथ असा बाज करून आपल्या अदाकारीने,अभिनयाने रसिकांची मने जिंकली आहेत.

लक्ष्मीताई ची राहणीमान साधी असून, रसिकांचे प्रेम, सुखदुःखात सहभागी, कलाकारांवरील प्रेम,फड मालकाशी एकनिष्ठपनाने वागणे, खरे बोलणे इत्यादी गुण अंगी आहेत. लक्ष्मीताई स्टेजवर येताच रसिक टाळ्या वाजून व शिट्ट्या मारून स्वागत करतात. लक्ष्मीताई म्हणतात की, जुना रसिक तमाशा बघत नाही. कारण तमाशाचा जुना बाज होत नसल्याने सध्याचा तमाशा वर्ग फक्त गाणी मागतो त्यामुळे तमाशाचा बाज पहिल्यासारखा राहिलेला नाही म्हणूनच जुन्या रसिकांनी पाठ फिरवली आहे. शेवटी त्या म्हणाल्या की, कला ही मरेपर्यंत संपणार नाही.परंतु, कलाकारांनी व तमाशा फड मालकांनी वगनाट्यातून समाज प्रबोधन केले पाहिजे. तरच ही कला अजरामर राहील. अजूनही रसिक “पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची” ही लावणी आवडीने ऐकतात. खरंच, लक्ष्मीताईने आपल्या पहाडी आवाजाने ,अदाकारीने आणि अभिनयाने संपूर्ण महाराष्ट्रात नाव केले आहे.

सध्या लक्ष्मी ताई आपल्या आजीच्याच तमाशात आहे.या तमाशाला त्यांचे भरपूर योगदान आहे.या तमाशा मंडळाचे संचालक रोहित आणि मोहित हे दोन भाऊ असून,या तमाशा फडाची खंबीर धुरा सांभाळून महाराष्ट्राची सेवा करीत आहेत.आज लक्ष्मी ताईंचे वय 40 वर्ष असून गेली 27वर्ष रसिकांची व रंगदेवतेची सेवा करीत आहेत. लक्ष्मीताईंच्यातून रसिकांची, रंगदेवतेची सेवा घडो, त्यांचे नाव महाराष्ट्रात झळकत राहो, त्यांना उदंड आयुष्य मिळो, हीच ईश्वरा चरणी प्रार्थना.
😊
लेखक ✍🏻
शाहीर खंदारे
ता.नेवासा.
मो.8605558432

 

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.