आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

तानसा वन्यजीव अभयारण्य व आत्मा मालिक ध्यानपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिननिमित्त वृक्षरोपन व संवर्धन!!

तानसा वन्यजीव अभयारण्य व आत्मा मालिक ध्यानपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिननिमित्त वृक्षरोपन व संवर्धन!!

शहापूर तालुक्यातील मोहिली- अघई येथील तानास धरणालगत वन परिक्षेत्र विभाग ठाणे जिल्हा, एअर एन.सी.सी. मुंबई व विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट (कोकमठाण)संचलित, आत्मा मालिक ध्यानपीठ मोहिली- अघई यांच्या संयुक्त विद्यमाने दि.५ जून पर्यावरण दिननिमित्त वृक्षरोपन व संवर्धन उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. आत्मा मालिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रीसर्च (अभियांत्रिकी महाविद्यालय), आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कूल आत्मा मालिक इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज तसेच तानसा वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी उपस्थितांनी वृक्ष लागवड करून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.

तसेच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी शून्य सर्प दंश अभियान, वन्य जीवांच्या जाती-प्रजातीची माहिती, एन.सी.सी. च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.वृक्ष संवर्धनाचा संदेश वनविभागाच्या वतीने देण्यात आला.याप्रसंगी वनरक्षक मनीष पाचरणे, वनरक्षक संतोष खंदारे संदीप बनके, प्रतीक्षा हारणे, वनपाल युसुफ शेख , समीर इनामदार, दीपक शिंदे तसेच आत्मा मालिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रीसर्चचे प्राचार्य डॉ डी डी शिंदे, उपप्राचार्य गोविंद चव्हाण,व्यवस्थापक गुलाब हिरे, प्राचार्य पंकज बडगुजर, प्राचार्य कैलास थोरात आदीसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.


याबद्दल अभिनव उपक्रमबद्दल संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी साहेब व स्थानिक व्यवस्थापन समिती शहापूर शाखेचे कार्याध्यक्ष तथा विश्वस्त उमेश जाधव साहेब यांनी कौतुक केले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.