आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

जाणीव झाली बदल हवा!! शब्दांकन – कु.प्रतीक्षा भांड

जाणीव झाली बदल हवा!!

शब्दांकन – प्रतिक्षा भांड

१९४७ ला भारत स्वतंत्र झाला. भारत हे विकसनशील राष्ट्रआहे. टप्प्याटप्प्याने भारतात विकास होतोय. पण या विकसनशील भारतामध्ये एक गोष्ट मला नेहमी खटकत आली. ती म्हणजे महिलांचा विकास झाला का? महिलांचा विकास म्हणजे काय? महिलांचा विकास म्हणजे त्यांना पाहिजे असलेल्या सोयी सुविधा उपलब्ध झाल्यात का? तर नाहीच असं सांगतो. ज्यावेळी आपण लांबच्या प्रवासाला जातो तर किती रस्त्यांवर सार्वजनिक शौचालय आहेत.

एवढे हाय-फाय रस्ते आज आपल्या भारतामध्ये बनवत आहेत. पण माझ्या मनात सहज विचार आला. की महिलांना ज्या प्राथमिक सुविधा पाहिजे त्या रस्त्यावर त्या आहेत का? नक्कीच नाही. स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात झाली तेव्हा कुठे गावोगावी शौचालय बांधली गेली. बेटी बचाओ सरकार खूप मोठा प्रकल्प हाती घेण्यात आला. पण तो यशस्वी झाला का. ज्याप्रमाणे आपण पाश्चिमात्य संस्कृतीचा स्वीकार करतोय. त्याचप्रमाणे पाश्चिमात्य महिलांना दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधांचा देखील विचार करावा.

आमच्या भागात ऊसतोड कामगार येतात. त्यातील बहुतांश ह्या महिला असतात. पहाटे चार वाजता शेतात जातात. मी अनेक वेळा पाहिलेला आहे त्यातील कित्येक महिला या गरोदर असतात. जर गरोदर स्त्रीलाच काम करावं लागत असेल सामान्य स्त्रीची काय अवस्था असेल. ह्या ऊसतोड कामगार महिला असतात ना. पहाटे लवकर उठून स्वयंपाक बनवून ह्या त्या तांड्याबरोबर शेतात जातात. ऊसतोड करण काय सोप्प काम नाहीये. पण म्हणतात ना की पोटाची आग शांत बसून देत नाही. पोटात एक जीव असून देखील त्या महिला दिवस रात्र काबाडकष्ट करतात. अहो त्यांच्याबरोबर लहान लहान मुले देखील असतात. जे वय खेळायचं बागडायचं शिकायचं असतं. त्या वयात त्यांच्या हातात कोयता येतो. त्यांच्या आयुष्यात येणार उसाचे पाचट हे फक्त पाचट नसून त्यांच्या आयुष्याला लागलेली पाचर आहे.
अजून एक उदाहरण माझ्या डोळ्यासमोर आहे. भारत हे विकसनशील राष्ट्र हे मी वरच नमूद केलेलं आहे. रस्त्याची काम मोठ्या प्रमाणावर होत असताना पाहायला भेटतात. यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर महिला असतात. काय अवस्था होत असेल त्यांची विचार केला का. दिवसभर दगडाचे ढीग फोडायचे. त्यापासून खडी बनवायची ती खडी पांगवायची. यांच्या कष्टातून खऱ्या अर्थाने रस्ता बनत असतो. आणि त्याच रस्त्यावर आपण मोठ्या गाड्या घेऊन जायचं. की हा जो रस्ता झाला नेत्या पुढाऱ्यांनी बनवला की या कामगारांच्या घामाने बनला हे लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे.

उन्हाळ्यात आमच्या भागात विहिरी खांडल्या जातात. त्यावर देखील महिला कामगार काम करताना पहावयास भेटतात. विहिरीचा खडक फोडताना आम्ही त्यांना पाहतो. उन्हाताना त्यांनी फोडलेल्या खडकातून जेव्हा पाणी येतं ना. त्यावेळी शेतकऱ्याला खूप आनंद होतो. आपण विहिरीला लागलेल्या पाण्याचा विचार करतो. ते पाणी खडकातून काढण्यासाठी शरीरातून निघालेल्या कामाचं काय. तुम्ही म्हणत असाल त्याचा मोबदला तर त्यांना भेटतोय की. पण त्या मोबदल्यावर ते समाधानी आहेत का हा विचार कधी केला का. आणि आपल्या मुलांना शिकवता यावं ते काम करत असतात.
आमच्या भागात दिसणारा अजून एक उदाहरण. दिवाळी झाली की आमच्या भागात मेंढपाळ येतात. मेंढ्यांचा खूप मोठा कळप घेऊन त्या आमच्या भागात चारण्यासाठी येतात. उघड्यावर संसार असतो त्यांचा. पांघरण्यासाठी आभाळ आणि उशासाठी दगड हीच त्यांची संपत्ती. माळरानावर कुठेतरी पाल ठोकायचं. अशा उघड्या माळरानावर स्वयंपाक बनवायचा. ती जागा सोडून दुसऱ्या गावात प्रवास करायचा. कधी त्या महिला बाबत विचार केला. कसा विचार करणार ना. आम्हाला आमचं आम्ही सुखात आहोत हेच खूप झालं.
मी वरती जी जी उदाहरणे दिली आहेत त्यामध्ये महिला कामगार या मोठ्या प्रमाणावर आहे. काहीच नाही. तरी आम्ही लगेच डॉक्टर कडे जातो. तमा न बाळगता दिवस रात्र काम करणाऱ्या महिलांचं काय?

हो मान्य आहे की आम्ही त्यांची परिस्थिती बदलू शकत नाही. त्यांना किमान प्राथमिक सुख सुविधा तरी देऊ शकतो. त्यांच्या आरोग्याकडे तर लक्ष देऊ शकतो. बेटी बचाव बेटी पढाव अशा सारखे योजना येत राहतील जात राहतील. पण यातील बेटीच काय?

आम्हाला वारंवार जाणीव होते पण बदल होताना दिसून येत नाही. जाता जाता एवढेच सांगेल जाणीव झाली बदल हवा..!

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.