आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

स्त्रीच अस्तित्व हाच जीवनाचा सुंदर दागिना!! शब्दांकन – कू.प्रतिक्षा भांड

स्त्रीच अस्तित्व हाच जीवनाचा सुंदर दागिना!!

शब्दांकन – कु.प्रतिक्षा भांड

भारत हे पितृसत्ताक राष्ट्र आहे. इथे फक्त भारत भूमी ला माता म्हंटल जात. भारतात महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत राजकीय आरक्षण देण्यात आलं. याचा मुख्य हेतू होता कि, महिलांना राजकीय प्रवाहात घेऊन येणे. पण खरच महिला राजकीय प्रवाहात आल्या का. आजही कित्येक गावात महिला ह्या ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच आहेत. पण किती महिला स्वतः आपल्या अधिकाराचा वापर करतात. त्यांच्याकडे पद हे फक्त नावाला आहेत कारण महिला फक्त सही करण्याचं काम करतात निर्णय घेण्याचा अधिकार मात्र त्यांच्या पतीला असतो.

स्थानिक पातळीवर जाऊद्या आज पर्यंत फक्त प्रतिभाताई पाटील व द्रौपदी मुर्मू यांनाच राष्ट्रपती पदावर बसता आलं आणि पंतप्रधान पदावर इंदिरा गांधी यांनाच विराजमान होता आलं. यावरूनच दिसून येत कि देशाच्या सर्वात मोठ्या पदावर देखील पुरुष प्रधान संस्कृती दिसून येते.
महाराष्ट्र हा तर राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांसारख्या मातेच्या पद स्पर्शाने पावन झालेली भूमी आहे पण महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदी आज पर्यंत एकही महिला बसलेली नाही.जी महिला घर चालवू शकते ती राज्य काय तर देश देखील चालवू शकतात.

एक तुलना करू नवरा आणि बायको हे एकच शाळेत शिक्षक म्हणून कार्य करतात. पण विचार करा त्या महिला शिक्षीकेला घरातील सर्व कामे करून शाळेत जावं लागत. पण पुरुषाच काय त्याला थोडी कपडे धुवायची असतात कि स्वयंपाक करायचा असतो. हा विरोधाभास कमी झाला पाहिजे.कधीच मागे न हटणारी एक स्त्री असते, प्रत्येक परिस्थितीत अगदी खंबीरपणे पाय रोवून त्या परिस्थितीला सामोरे जाणारी देखील एक स्त्री असते .जे काही आहे त्यात सुख शोधणारे आणि प्रत्येक नातं घट्ट बांधून ठेवणारी एक स्त्रीच असते .अगदी घरातील हिशोबापासून तर देशाचा लेखाजोखा सांभाळणारी ती कोणाची तरी आई ,बहीण ,मैत्रीण या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडणारे एक स्त्रीच असते.

नऊ दिवस देवीचा उत्सव मोठ्या भक्ती भावाने आपण साजरा करत असतो .आपण दररोज स्टेटस अन् स्टोरीला देवीचे फोटो आणि व्हिडिओ टाकत असतो. जसे काय आपण देवीचे खूप मोठे भक्त आहोत .हो आपण आहोत भक्त .पण का असू नये ,आपण हिंदू आहोत .पण एक सांगू का खरी नवरात्र कधी साजरी होईल माहितीये का? समाजातील प्रत्येक स्त्री आपल्या बहिणी समान असेल. ज्या दिवशी राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपल्याला रुजत नाही तोपर्यंत कितीही नवरात्र साजरी करा सगळं व्यर्थ आहे.

जेव्हा स्त्रिया कशाने अडत नाही ,कशाने नडत नाही, तेव्हा तिच्यावर हल्ले होतातच. त्यामुळे नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची मला रडायचं नाही लढायचं आहे. त्यामुळे एक गोष्ट नेहमी स्वतःला सांगत जा .मला जर सावित्री जिजाऊ अहिल्यादेवीची लेक बनायचं असेल ,तर स्वतःला नेहमी सांगा मी लढणार आहे. तुम्ही आलात तर तुमच्या सहित, अन् नाही आले तर तुमच्या विना लढणार आहे. होय मी स्वतः ठामपणे लढणार आहे.

युवा, युवा या शब्दाचा खरा अर्थ काय आहे माहिती का तुम्हाला, युवा म्हणजे वायूच्या वेगाने विचार करणारे ,वायूच्या वेगाने लढणारी ,अन वायुसारखे धमक असणारी ,आजची युवती आहे. फार मोठी स्वप्न बघण्यापेक्षा स्वप्न छोटी असावी. पण त्याने आपलं अंगण उजळून दिसावं .एवढं सक्षम या स्त्रियांनी असलं पाहिजे. डाव्या हाताचा अंगठा कापून द्यायच्या आधी उजव्या हाताने बान चालवायचं कौशल्य मी शिकलो असं एकलव्य बोलतात .पण असंच सक्षम आजच्या स्त्रियांनी असलं पाहिजे.

कवी किशोर कदम यांनी एका चित्रपटासाठी एक गीत लिहिलं होतं. आता तुम्ही म्हणाल की किशोर कदम हे तर खूप मोठे कवी आणि अभिनेते आहे .त्यांच्या कविता किंवा गाणी चांगलेच असतात .पण ते गीत होतं बाईच्या जन्मावर आधारित. काकस्पर्श चित्रपटातील जन्म बाईचा, हे गीत बाईच्या जन्मापासून तिच्या आयुष्यात येणारे प्रसंग या गीतात रेखाटले आहे .त्यांनी शेवटच्या कडव्यात एक ओळ खूप सुंदर लिहिली आहे .ती ओळ अशी आहे की, “माय ही सांगे अर्थ मायेचा” म्हणजेच एका स्त्रीचे दुःख ही एक स्त्रीच सांगू शकते ,आणि समाजासमोर मांडू शकते.

असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो .आणि ते खरं देखील आहे .इतिहासात जर आपण डोकावून पाहिलं तर हिंदवी स्वराज्याची स्थापना ही छत्रपती शिवाजी महाराजांनी केली .पण स्वराज्याचा स्वप्न हे राजमाता जिजाऊंनी पाहिलं होतं. ज्यावेळी अफजल खान स्वराज्यावर चालून आला होता त्यावेळीची गोष्ट .हा तोच अफजलखान होता ज्याने शिवरायांचे मोठे बंधू संभाजी यांना कपटाने मारले होते. आणि आता तोच अफजलखान आपल्या छोट्या मुलाला मारण्याचा विडा उचलून आला होता .त्यावेळी सगळे सांगत होते की शिवरायांनी तह करून स्वराज्यावरचा संकट टाळावं .अगोदर एक मुलगा गमावल्यानंतरही जिजाऊंनी शिवरायांना सांगितलं की शिवबा तुम्ही माझे पुत्र नसून अवघ्या मराठी जणांचा स्वाभिमान आहात .एका मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर .पण अवघ्या मराठी जणांचा स्वाभिमान गमावता कामा नये. आपण स्त्रीला अबला म्हणतो पण स्त्री ने राजमाता जिजाऊ प्रमाणे सबला असलं पाहिजे.

समान मानव माना स्त्रीला,
तिची अस्मिता खुडु नका,
देवी म्हणूनी धजू नका ,
वा दासी म्हणुनी पिटू नका!

समाजाने स्त्रीला देवी म्हणून पूजा व ही अपेक्षा नाही. समाजाने स्त्रीला दासी म्हणून हिनवाव हेही उचित नाही .फक्त या समाजाकडून एवढीच अपेक्षा आहे की, समाजाने स्त्रीला माणूस म्हणून समानतेची वागणूक द्यावी.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.