विक्रीकर अधिकारी श्री.हितेश ज्ञानेश्वर ढोबळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपण संपन्न!!

विक्रीकर अधिकारी श्री.हितेश ज्ञानेश्वर ढोबळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपण संपन्न!!
आंबेगाव तालुक्यातील पारगाव (शिंगवे) येथील श्री तुकाईदेवी मंदिर ढोबळेमळा परिसरात विक्रीकर अधिकारी श्री. हितेश ज्ञानेश्वर ढोबळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी कृषी मंडल अधिकारी सोपान लांडे, सहाय्यक कृषी पर्यवेक्षक प्रसन्ना जाधव, सहाय्यक कृषी पर्यवेक्षक अरुण जोरी, सहाय्यक कृषी पर्यवेक्षक राजश्री पवार, प्रगतशील शेतकरी तथा शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त विकास चव्हाण, आत्मा संयोजक कृषी विभाग धोंडीभाऊ पाबळे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला उपाध्यक्ष ऍड. रूपालीताई भोजने, पारगावच्या सरपंच श्वेताताई किरण ढोबळे, निरगुडसर गावच्या सरपंच उर्मिलाताई वळसे पाटील, आदर्श ग्राम विकास अधिकारी दत्तात्रय धोंडीबा भोजने, रंजनी गावच्या सरपंच छायाताई बंडू वाघ, ग्रामपंचायत सदस्य किरण शांताराम ढोबळे, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर नाना ढोबळे,नानाभाऊ ढोबळे, गणेश लक्ष्मण ढोबळे, शरद दातखिळे, सतीश दातखिळे आदी मान्यवर उपस्थित होते.
दयानंद ज्ञानेश्वर ढोबळे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम संपन्न झाला. झाडे लावा झाडे जगवा हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
पारगावचे मा. सरपंच बबनराव नामदेव ढोबळे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले