खेड तालुक्यातील महिलांचा शिवसेना उपनेते, मा.खासदार श्री.शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश!!

खेड तालुक्यातील महिलांचा शिवसेना उपनेते, मा.खासदार श्री.शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश!!
महिला पदाधिकाऱ्यांनी केवळ प्रचारापुरते मर्यादित न राहता महिला सक्षमीकरण, शहराचा विकास व महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा, महिलांचे प्रश्न ज्वलंतपणे मांडावेत, याकामी तुमच्या पाठीशी तुमचा भाऊ म्हणून मी सदैव उभा राहील असे प्रतिपादन मा.खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केले.बाळासाहेबांची शिवसेना पक्षात नवनियुक्ती दिलेल्या खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथील महिला पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. या वेळी खेड महिला आघाडी तालुका अध्यक्षपदी सौ.ज्योती केशव आरगडे यांच्यासह विविध महिला पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित केले गेले.
यावेळी उपस्थित महिलांशी संवाद साधताना सांगितले आढळराव पाटील म्हणाले की, शिरूर लोकसभेतील ५०० महिला पदाधिकाऱ्यांची स्वतः मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे साहेब यांच्याशी भेट घडवून महिलांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. दि. १९ फेब्रुवारी शिवजयंतीच्या दिवशी १३.९० कोटी रकमेच्या राजगुरुनगर पंचायत समिती इमारत भूमिपूजनासाठी मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली आहे. महिला पदाधिकाऱ्यांनी आपल्या भागात मोठमोठे उद्योग निर्माण व्हावे त्यासाठी प्रयत्नशील राहावे मी त्यांना सर्वोतोपरी मदत करेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, तालुकाप्रमुख राजूशेठ जवळेकर, सांडभोरवाडी काळुस जिल्हा परिषद गटाचे शिवसेना मा.विभागप्रमुख प्रशांत गाडे, खरपुडी खुर्द गावच्या मा.सरपंच सौ.वनिताताई प्रशांत गाडे तसेच राजगुरुनगर शहरातील नयनाताई झनकर यांचा नेतृत्वाखाली असंख्य महिला उपस्थित होत्या. यावेळी सौ. पुजाताई राक्षे, सौ मिनाक्षीताई पवार, सौ यशोदा चिमटे, सौ शोभाताई वाळुंज, सौ गीताताई भोगटे, सौ स्वप्नाताई कुलकर्णी, सौ सुनिता सांवत, सौ मनिषाताई घुमटकर, सौ पुष्पाताई टकले, सौ सुनिताताई वाळुंज, सौ वनिताताई आढारी, सौ सुभद्रा जन्झरे, सौ निशाताई भिंगारकर, सौ.आश्विनीताई शेळके, सौ अनिताताई गुंजाळ, सौ आशा वनघरे, सौ मंजुताई भालेकर, सौ गीता शिंदे, सौ अलकाताई माने या सर्वांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहिर प्रवेश केला.
या वेळी जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, युवासेना तालुकाप्रमुख विशालआप्पा पोतले, महिला आघाडी तालुका संघटीका ज्योतीताई अरगडे, शिवसेना उपतालुका प्रमुख अंबर सावंत, शिवसेना विभागप्रमुख राहुलशेठ थोरवे, युवासेना उपतालुका प्रमुख योगेशभाऊ पगडे, युवासेना उपतालुका प्रमुख सचिनभाऊ चोधरी, युवासेना उपतालुका प्रमुख संदिपशेठ काचोळे, रोहकल गावच्या सरपंच प्रमिलाताई संदिपशेठ काचोळे, शेतकरी सेना उपविभाग प्रमुख प्रविणशेठ ठाणगे, वाहतूक सेना उपविभाग प्रमुख विकास थोरवे, चर्होली शिवसेना शाखाप्रमुख संदिपशेठ पगडे आदी उपस्थित होते.