आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूलमोहिली- अघईत संविधान दिवस साजरा!!
आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूलमोहिली- अघईत संविधान दिवस साजरा!!
२६/११ च्या शहिदांना मानवंदना!!
शहापूर – शहापूर तालुक्यातील मोहिली- अघई येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट(कोकमठाण)संचलित,आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलात आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूलमध्ये भारतीय संविधान दिवस साजरा करण्यात आला.तसेच मुंबईतील २६/११ दिवशी दहशतवादी हल्ल्यातील वीरगती प्राप्त झालेल्या शहिदांना विद्यार्थ्यांकडून मानवंदना देण्यात आली. यावेळी संत भारत माता,संकुलाचे कार्याध्यक्ष उमेश जाधव साहेब, स्थानिक सदस्य अनंत गायकवाड,प्रवीण मोरे,भारत सलगर, शैक्षणिक संचालक डॉ. डी.डी.शिंदे,व्यवस्थापक उल्हास,आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य कैलास थोरात उपस्थित होते.यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना भारतीय संविधान बद्दल माहिती दिली.
यावेळी आरवा राजगुरू,विद्या भानुशाली विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाविषयी भाषणं केले.तसेच आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक प्रकाश सिंग,पंकज दाहिंजे यांनी व्याख्यान दिले तसेच जयेश बामेरे यांनी सविधाना विषयक कविता सादर केली. कार्यक्रमासाठी अथक परिश्रम संस्कृतिक विभाग प्रमुख दिपाली खांडगे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी घेतले.