गणेश जयंतीच्या निमित्ताने आंबेगाव तालुक्यातील वाळूंजनगर (लोणी) येथे भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन!!

गणेश जयंतीच्या निमित्ताने आंबेगाव तालुक्यातील वाळूंजनगर (लोणी) येथे भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन!!
गणेश जयंतीचे औचित्य साधून आंबेगाव तालुक्यातील वाळुंजनगर (लोणी) येथे गणेश चॅरिटेबल ट्रस्ट, समस्त ग्रामस्थ वाळूंजनगर यांच्या वतीने भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती वाळुंजनगर ग्रामस्थांनी प्रसिद्धपत्रकाने दिली आहे. ही स्पर्धा समूह व वैयक्तिक अशा दोन्ही स्वरूपात संपन्न होणार असून विजेत्या स्पर्धकांना भरघोस स्वरूपाची बक्षिसे देण्यात येणार आहेत.
सदर स्पर्धा बुधवार दि.24 जानेवारी 2023 रोजी सायं.7.00 सुरु होणार असून समूह नृत्य विजेत्या स्पर्धकांना प्रथम क्रमांक -11,000- व चषक, द्वितीय क्रमांक -9,000/- व चषक, तृतीय क्रमांक -7,000/- व चषक, चतुर्थ क्रमांक -5,000-/ व चषक तर वैयक्तिक नृत्य स्पर्धकांना प्रथम क्रमांक -5,000-/ व चषक, द्वितीय क्रमांक -4,000/- व चषक, तृतीय क्रमांक – 3,000/- व चषक,चतुर्थ क्रमांक -2,000/- व चषक स्वरूपात बक्षिसे देण्यात येणार आहेत.
सदर स्पर्धेसाठी नावनोंदणी सुरु झाली असून सहभागी स्पर्धकांनी लवकरात लवकर नाव नोंदणी करावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.