आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

शिवसेना उपनेते, मा.खा.श्री.शिवाजीराव आढळराव पाटील यांनी घेतली गंगावणे कुटुंबीयांची भेट.

शिवसेना उपनेते, मा.खा.श्री.शिवाजीराव आढळराव पाटील यांनी घेतली गंगावणे कुटुंबीयांची भेट.

समृद्धी महामार्गावर झालेल्या दुर्दैवी बस अपघातामध्ये शिरूर शहरातील गंगावणे कुटुंबातील शिक्षक कैलास गंगावणे यांचेसह त्यांची पत्नी व मुलगी यांचा मृत्यू झाला. हृदय हेलावून सोडणाऱ्या या घटनेमुळे गंगावणे सर्वच जण दुःखाच्या छायेत असून या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या स्थितीतून धीर व मानसिक आधार देण्यासाठी त्यांच्या घरी जाऊन मा. खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांनी नातेवाईकांची भेट घेतली.

ही घटना दुर्दैवी असुन अपघातात मृत्युमुखी पडलेली डॉ.ऋतुजा ही आढळराव पाटील यांच्या लांडेवाडी येथील शाळेची माजी विद्यार्थिनी होती. अपघातात आदित्य याचे आई, वडिल व बहिण दगावले गेले आहेत. आदित्य यास एकट्याने नागपूरला जावून शिक्षण घेणे मानसिक दृष्ट्या चांगले राहिल असे वाटत नाही. त्याचबरोबर अभ्यासात लक्ष लागेल अस वाटत नाही. त्यामुळे त्याचे ॲडमिशन पुणे परिसरात करण्याबाबत शासनाने पुढाकार घ्यावा याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटुन निवेदन देणार असुन मुख्यमंत्री सकारात्मक भूमिका घेतील असा विश्वास यावेळी आढळराव पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

यावेळी त्यांच्यासमवेत शिवसेना शिरूर तालुकाप्रमुख पै.रामभाउ सासवडे, माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले, तालुका संघटक संतोष गव्हाणे, शहर प्रमुख मयूर थोरात, उपतालुकप्रमुख अण्णा हजारे, उपशहरप्रमुख गणेश गिरे, भरत जोशी, शुभम माळी, सुरेश गाडेकर आदी उपस्थित होते.

व्यक्तीश: मी व सर्व शिवसेना परिवार गंगावणे कुटुंबीयांच्या सोबत खंबीरपणे उभा असून अशा बिकट परिस्थितीत त्यांना एकटे न सोडता आवश्यक ते सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे आढळराव पाटील यांनी या वेळी सांगितले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.