आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

शिवसेना उपनेते,मा.खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी घेतली गंगावणे कुटुंबीयांची भेट.

शिवसेना उपनेते,मा.खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी घेतली गंगावणे कुटुंबीयांची भेट.

समृद्धी महामार्गावर झालेल्या दुर्दैवी बस अपघातामध्ये शिरूर शहरातील गंगावणे कुटुंबातील शिक्षक कैलास गंगावणे यांचेसह त्यांची पत्नी व मुलगी यांचा मृत्यू झाला.हृदय हेलावून सोडणाऱ्या या घटनेमुळे सर्व गंगावणे दुःखाच्या छायेत असून या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या स्थितीतून धीर व मानसिक आधार देण्यासाठी मा.खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांच्या समवेत शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत त्यांच्या घरी जाऊन नातेवाईकांची भेट घेतली.

व्यक्तीश: मी व सर्व शिवसेना परिवार गंगावणे कुटुंबीयांच्या सोबत खंबीरपणे उभा असून अशा बिकट परिस्थितीत त्यांना एकटे न सोडता आवश्यक ते सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे आढळराव पाटील यांनी या प्रसंगी सांगितले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.