ताज्या घडामोडीराजकीय

आज दिनांक 28/6/2023 मंत्रिमंडळनिर्णय (संक्षिप्त)

आज दिनांक 28/6/2023 मंत्रिमंडळनिर्णय (संक्षिप्त)

🔶वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ यांचे नाव
🔶‘एमटीएचएल’ला ‘अटलबिहारी वाजपेयी स्मृती शिवडी न्हावा शेवा अटल सेतू’ असे नाव
🔶 राज्यात ७०० ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना. २१० कोटी रुपयांस मान्यता
🔶 भामा आसखेड प्रकल्पाचे कालवे रद्द करणार. तीन तालुक्यांतील शेतकऱ्यांना लाभ
🔶 महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजना एकत्रित राबविणार. २ कोटी कार्ड्स वाटणार, आता मिळणार ५ लाखांपर्यंत आरोग्य संरक्षण.
🔶 संजय गांधी, श्रावणबाळ योजनेतील निवृत्तीवेतनात भरीव वाढ
🔶 आता असंघटित कामगारांच्या कल्याणासाठी महामंडळ. करोडो कामगारांना लाभ मिळणार
🔶 नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा; विदर्भातील जिल्ह्यांचा समावेश
🔶 मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे भव्य स्मारक छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे उभारणार. १०० कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता
🔶 पूर प्रतिबंधासाठी राज्यातील १६४८ किमीच्या नद्यांमधील गाळ काढणार
🔶 मुंबई मेट्रो-३ मार्गासाठी धारावीचा भूखंड. भूखंडाच्या हस्तांतरणातील अनर्जित रकमेसाठी सुधारित धोरण
🔶 मुखेड, उमरखेड, चिखलदरा, महाड, हरसूल,वरूड, फलटण येथे न्यायालये स्थापणार
🔶 राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये अद्ययावत उत्कृष्टता केंद्र सुरू करणार
🔶 सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या क्लस्टरला प्रोत्साहन, पायाभूत सुविधांसाठी ‘सिडबी’शी करार
🔶 बीडीडी चाळ पुनर्विकासातील झोपडीधारक, स्टॉलधारकांची पात्रता निश्चित
🔶 जालना ते जळगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी ३५५२ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता
🔶 राज्यात ९ ठिकाणी नवीन शासकीय महाविद्यालये. ४३६५ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता
🔶 बुलढाणा येथे शासकीय कृषि महाविद्यालय सुरू करणार
🔶 दीनदयाळ अंत्योदय योजना आता १४३ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविणार
🔶 दारिद्र्य रेषेवरील पालकांच्या मुलांना देखील मोफत गणवेश देणार. १२ लाख विद्यार्थ्यांना लाभ
🔶 देवळा, वैजापूर तालुक्यातील बंधाऱ्यांना मान्यता
🔶 चांदुर बाजार तालुक्यात लिंबूवर्गीय फळांसाठी सिट्रस इस्टेट
🔶 सर जे. जे. कला आणि वास्तुशास्त्र महाविद्यालय आता अभिमत विद्यापीठ
🔶 गंगापूर उपसा सिंचन योजनेस मान्यता
🔶 ग्रामपंचायत निवडणुकीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्षाची मुदतवाढ
🔶 पाकिस्तानने पकडलेल्या मच्छिमारांच्या कुटुंबीयांना उदरनिर्वाहासाठी मदत करणार
🔶 पर्यटन उपविभागासाठी उप सचिव दर्जाचे पद मंजूर

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.