आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीराजकीय

मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण आंदोलनाला सातगाव पठार भागातील शेतकऱ्यांचा ओघ वाढला.

मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण आंदोलनाला सातगाव पठार भागातील शेतकऱ्यांचा ओघ वाढला.

खेड, आंबेगाव व शिरूर तालुक्यातील कोरडवाहू गावांना वरदान ठरणाऱ्या कळमोडी प्रकल्पाला गती मिळण्यासाठी व डिंभे धरणातून बोगद्याद्वारे पाणी थेट नगर जिल्ह्यात नेण्याचा घाट घालणाऱ्या प्रवृत्तींना रोखण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर जिल्हा परिषद सदस्य देविदास दरेकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी बांधव तीन दिवसांपासून उपोषण आंदोलन करत आहेत.

आज आंबेगाव तालुक्याच्या सातगाव पठार भागातील शेतकरी बांधवांनी मुंबई येथील आझाद मैदानात मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होऊन जाहीर पाठिंबा दिला. यावेळी पेठ गावचे सरपंच राम तोडकर यांनी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना देविदास दरेकर यांनी पाणी प्रश्नांसाठी घेतलेल्या उपोषण आंदोलनास मनापासून पाठिंबा देण्याचे आवाहन केले. तसेच पाणी प्रश्नांसाठी लढणाऱ्या आंदोलकांवर राजकीय हेतूने प्रेरित होऊन खोटे आरोप करणाऱ्या व्यक्तींना सातगाव पठारावरील जनता कदापी माफ करणार नाही असा सज्जड इशारा दिला. शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनिल बाणखेले यांनी याप्रसंगी आंदोलनाला जाहीर पाठिंबा व्यक्त केला.

यावेळी युवासेना कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर, युवासेना जिल्हाप्रमुख प्रविण थोरात पाटील, उद्योजक कृष्णा पवळे, बाळकृष्ण गटे, जेष्ठ नेते भागा एरंडे, अशोकराव बाजारे, रविंद्र तोत्रे, गणपतराव कराळे, विलासराव घेवडे, संजय पवळे, शरद भोजणे, अरुण एरंडे, अशोक राक्षे, महादेव कराळे, नरेंद्र पवळे, प्रल्हाद कुदळे, बबू धुमाळ, बाबाजी ढमाले, पंढरीनाथ काळे, अशोक चक्कर, सुनील एरंडे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.

मुंबई येथील शिवसेना उपविभागप्रमुख व पेठ गावचे भूमिपुत्र कृष्णाशेठ निवृत्ती पवळे यांनी जाहीर पाठिंबा दिला.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.