आरोग्य व शिक्षण

सावली सोशल सर्कलच्या साहित्य व कला कट्ट्या तर्फे आयोजित ‘जागतिक मराठी भाषा गौरव दिनाच्या’ निमित्ताने सुरू असलेल्या ‘मराठी भाषा महोत्सव’ सध्या सावली केअर सेंटर च्या प्रमाणात जोशामध्ये सुरू!!

सावली सोशल सर्कलच्या साहित्य व कला कट्ट्या तर्फे आयोजित ‘जागतिक मराठी भाषा गौरव दिनाच्या’ निमित्ताने सुरू असलेल्या ‘मराठी भाषा महोत्सव’ सध्या सावली केअर सेंटर च्या प्रमाणात जोशामध्ये सुरू आहे. पहिल्या दिवशी स्वरमल्हार या संस्थेच्या सहकार्याने मराठी गीतांचा कराओके गाण्याचा रंगारंग कार्यक्रम पार पडला. यामध्ये कोल्हापूर मधील १८ नामवंत कलाकारांनी सहभाग घेतला. भूपाळी पासून लावणी पर्यंत मराठीतील सर्व प्रकारची गाणी या कार्यक्रमात सादर केली गेली. विशेष म्हणजे मा. आमदार श्री सुजित मिणचेकर यांनीही आपल्या पहाडी आवाजात गाणी सादर करून प्रेक्षकांना डोलायला लावले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री उत्तम जोशी यांनी केले.

या कार्यक्रमास कोल्हापूर मधील ज्येष्ठ शास्त्रीय गायक श्री विनोद दिग्रजकर सप्नीक तसेच ज्येष्ठ गायक श्री राजेंद्र मेस्त्री पूर्णवेळ हजर होते. कलाकारांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारताना त्यांनी सुरांचं महत्त्व विशद केलं आणि गायकी अजून प्रगत होण्यासाठी रियाज करत रहा असा वडिलकीचा सल्लाही दिला. ‘कराओके कलाप्रकार हा लाईव्ह ऑर्केस्ट्रा पेक्षा सादरीकरणास कठीण आहे कारण यामध्ये एखादा गायक चुकला असता त्याला सावरून घेण्यासाठी काहीही प्रयोजन असत नाही. त्यामुळे कराओके प्रकारामध्ये गायकाचे परफेक्शन अत्यंत महत्त्वाचे असते’, असे प्रतिपादन श्री राजेंद्र मिस्त्री यांनी केले.

दुसऱ्या दिवशी या महोत्सवाचे दुसरे पुष्प गुंफले गेले. प्रसिद्ध साहित्यिक श्रीराम पचिंद्रे आणि संजीवनी तोफखाने यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापूर जिल्हा आणि परिसरातील २४ कवींचे कवी संमेलन पार पडले. समाजातील विविध शैक्षणिक स्तरातून आलेल्या या कवींनी प्रेम गीत, भक्तीगीत, तसेच समाजातील विविध प्रश्नांवर आपल्या कवितांमधून उत्तमरीत्या भाष्य केले. सूत्रसंचालन जुई कुलकर्णी आणि सुवर्णा दीक्षित यांनी केले.

या सर्व कलाकारांना सावली केअर सेंटर तर्फे चिमण्यांची घरटी भेट म्हणून देण्यात आली. याद्वारे साहित्याबरोबर पर्यावरणासंदर्भातही संदेश देण्याचा प्रयत्न केला गेला.

कार्यक्रमास कोल्हापूर शहर आणि परिसरातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली.

तिसऱ्या दिवशी रंगमुद्रा पुणे आयोजित ‘सावरकरांचा मृत्यूशी संवाद’ या नावाचे अभिवाचन सादर करण्यात आले. या प्रयोगाचे लेखन श्री योगेश सोमण यांनी केलेले असून दिग्दर्शन श्री नरेंद्र आमले यांनी केले आहे. श्री उमेश घळसासी आणि श्री नरेंद्र आमले यांनी हे अभिवाचन सादर केले.
या प्रयोगासाठी प्रसिद्ध उद्योजक श्री नितीन वाडीकर, संतोष पंडित, विनायक गोखले, श्री वाघापूरकर यांच्या समवेत अनेक सावरकर प्रेमींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सावली केअर सेंटर चे सौरभ शेवाळे योगेश चव्हाण ऋषिकेश डोंगळे, शिवानंद पुयम, कुणाल सरावणे यांनी विशेष मेहनत घेतली.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.