आरोग्य व शिक्षण

भारतीय जैन संघटना वाघोली येथे मराठी राजभाषा दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात झाला संपन्न!!

भारतीय जैन संघटना वाघोली येथे मराठी राजभाषा दिन व राष्ट्रीय विज्ञान दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमांतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, निबंध स्पर्धा आणि विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते.सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन प्रतिमा पूजन करून विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.पवार पी आर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

सदर कार्यक्रमात इयत्ता अकरावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी विविध कला सादर केल्या त्यामध्ये लोककला, लावणी नृत्य, नाटक, अंधश्रद्धा निर्मूलन- जनजागृती, पोवाडा, यासारखे समृद्ध मराठी गुणगौरव करणारे घटक सादर केले. विज्ञानाच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान गीतावर नृत्य सादर केले तसेच जय हो या गाण्यातून विद्यार्थ्यांनी कोविड वॉरियर्स यांना मानवंदना दिली तसेच “जागतिक आरोग्यासाठी, जागतिक विज्ञान” या यावर्षीच्या विज्ञान दिनाच्या संकल्पनेची मांडणी केली.

सदरच्या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.पी.आर पवार सर उपस्थित होते, यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमास विद्यालयाचे उपप्राचार्य श्री.गेठे सर, डॉ.श्री.गोडसे सर, प्रा.गव्हाणे सर प्रा.सौ.सिंह मॅडम, प्रा.श्री.अंधारे सर व इतर सर्व प्राध्यापक उपस्थित होते. मराठी राजभाषा दिन वराष्ट्रीय विज्ञान दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासंदर्भातील मार्गदर्शन विद्यालयाचे प्राचार्य श्री.भंडारी सर यांनी केले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.