आरोग्य व शिक्षण

समर्थ शैक्षणिक संकुलात मराठी भाषा दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन!!

समर्थ शैक्षणिक संकुलात मराठी भाषा दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन!!

समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट राजुरी संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला.मराठी राजभाषा दिन दरवर्षी संकुलात साजरा केला जातो.

समर्थ संकुलाच्या प्रवेशद्वारामध्ये फलक लावून त्यावर मराठीतून स्वाक्षरी हा उपक्रम राबविण्यात आला.यावेळी विविध पुस्तकांचे प्रदर्शन उपस्थितांची खुले करण्यात आले.या निमित्ताने कथाकथन,कविता वाचन,परिच्छेद वाचन,मराठी निबंध स्पर्धा,नाट्य सादरीकरण,मराठी गाणी,मराठी अक्षर लेखन स्पर्धा आदी कार्यक्रमांचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले होते.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,बी सी एस चे प्राचार्य डॉ.उत्तम शेलार,डॉ.लक्ष्मण घोलप,एम बी ए चे प्राचार्य राजीव सावंत,समर्थ गुरुकुल चे प्राचार्य सतीश कुऱ्हे,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर,विद्यार्थी विकास मंडळाचे अधिकारी प्रा.अमोल भोर,प्रा.अमोल काळे,प्रा.दिनेश जाधव,राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा.विपुल नवले,सर्व विभागप्रमुख,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

समर्थ गुरुकुल या सीबीएसई मान्यता प्राप्त शाळेमध्ये मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यामध्ये विद्यार्थ्यांनी मराठी भाषेविषयी माहिती सांगितली.मराठी राजभाषा दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांनी मराठी लोक कलेवर आधारित नृत्य सादर केले.यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून मराठी भाषेचे महत्त्व सांगितले.

या वेळी संकुलात विविध पुस्तके,साहित्य,वाड्मय यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.त्यामध्ये मृत्युंजय,फकिरा झेप,गारंभीचा बापू,गरुड झेप या सारख्या कादंबऱ्या,हरिपाठ,भगवद्गीता,बायबल ,ज्ञानेश्वरी,भगवान बुद्ध,नामाचा नंदादीप,अमृतमंथन आदींसारखे धार्मिक ग्रंथ तसेच छत्रपती शिवाजी महाराज,महाराणा प्रताप,मराठ्यांचा इतिहास,सम्राट अशोक,आदींसारखी ऐतिहासिक पुस्तके काही चरित्रपर पुस्तके इ.पुस्तकांचा समावेश करण्यात आला होता.

मराठी वाचनाने आकलन शक्ती,धारणक्षमता आदींमध्ये वाढ होते.कुशाग्र बुद्धिमत्ता,प्रखर तेज आणि वाणीवर प्रभुत्व मराठी वाचनाने शक्य असल्याचे डॉ.लक्ष्मण घोलप यांनी सांगितले.मराठी भाषा संस्कृती संवर्धनासाठी व जोपासनेसाठी मराठीतून स्वाक्षरी,निरंतन मराठी वाचन,पुस्तक भेट,कविवर्य विंदा करंदीकरांच्या जन्मशताब्दीनिमित्त सार्थ स्मरण,साहित्यिकांशी गप्पा,ई बुक्स चे वाचन,वक्तृत्व स्पर्धा,निबंध स्पर्धा,कविता-लेखन स्पर्धा इ.चे आयोजन करण्यात आले होते.तसेच अनेकविध उपक्रमांचे आयोजन संकुलात करण्यात आले होते.महिन्यातून एक तरी मराठी पुस्तकाचे वाचन करू असा संकल्प उपस्थित विद्यार्थ्यांनी केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली औटी व स्मिता आहेर यांनी,प्रास्ताविक वैशाली सरोदे यांनी तर आभार प्रा. प्रदिप गाडेकर यांनी मानले.कार्यक्रमाची सांगता महाराष्ट्राचे राज्य गीत “जय जय महाराष्ट्र माझा ” या गीताने करण्यात आली.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.