आंबेगाव तालुक्यातील जवळे ग्रामपंचायत राबवित आहे अभिनव उपक्रम!!

आंबेगाव तालुक्यातील जवळे ग्रामपंचायत राबवित आहे अभिनव उपक्रम!!
जवळे(ता.आंबेगाव) ग्रामपंचायतच्या माध्यमातून पंधराव्या वित्त आयोग निधीमधून गर्भवती महिलांसाठी पूरक पोषण आहार मार्गदर्शन व ओटी भरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.प्रथमच हा कार्यक्रम ग्रामपंचायतने आयोजित केला होता.
यावेळी गर्भवती महिलांना मार्गदर्शन डॉ.माधुरी सांडभोर मॅडम, दुर्गा महाजन मॅडम यांनी केले.यावेळी जिल्हा परिषद पुणेचे डांगले साहेब यांनी स्वच्छ पाणी व आरोग्य विषय माहिती दिली.
या वेळी सरपंच वृषाली उत्तम शिंदे पाटील,सौ.मनीषा टाव्हरे (उपसरपंच) चंद्रकला गायकवाड, प्रमिला गावडे ,संगीता साबळे,पंकज चौधरी,अंगणवाडी सेविका शालन सोनवणे,संगीता वाळुंज,मदतनीस जयश्री शिंदे, शशिकला गावडे, ग्रामपंचायत अधिकारी शीला साबळे, आशा वर्कर सुंनदा शिंदे,मा.उपसरपंच दत्तात्रय लायगुडे, हरीचंद्र शिंदे,भूपेंद्र वाळुंज ग्रामरोजगार सेवक त्याच प्रमाणे मोठ्या संख्येने महीला भगिनी उपस्थित होत्या.सर्वांसाठी अल्पोउपहार ठेवण्यात आला होता.
गरोदर महिलांना खजूर,गूळ,शेंगदाणे,तिळाचे लाडू, खारीक,खोबरे,तूप,रवा,चिक्की किट वाटप करण्यात आले.