हिंदुहदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती धामणी गावात मोठ्या उत्साहात संपन्न!!

हिंदुहदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती धामणी गावात मोठ्या उत्साहात संपन्न!!
आपल्या कुंचल्यांच्या फटकाऱ्याने आणि भाषणातील शाब्दिक बाणाने विरोधकांना घायाळ करणारे अन् प्रत्येक मराठी माणसाच्या अंगात हिंदुत्वाची ज्वाला पेटवणारे अखंड भारताचे लाडके वक्ते, महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात ज्यांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिलं जातं असे सर्वांचे लाडके हिंदुहृदयसम्राट म्हणू बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतले जाते. आज 23 जानेवारी, बाळासाहेब ठाकरे यांची जयंती. राज्यभरात आज बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे.
धामणी गावामध्ये मोठ्या उत्साहात वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली.
पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेले यांनी बोलताना सांगितले की वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुळे आज आम्ही घडलो. ८०%समाजकारण व २०%राजकारण हे ब्रीदवाक्य घेऊन शिवसेना तळागाळात काम करत आहे.
सुभाष नेते जाधव यांनी बोलताना सांगितले की शिवसेना नाव उच्चारले की अंगातले रक्त सळसळते. आयोध्या मध्ये राम मंदिर झाले हे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते ते आज सत्यात उतरले आहे.
त्याप्रसंगी मा. सरपंच सागर जाधव, उपसरपंच अक्षयराजे विधाटे, दीपक जाधव व्हॉइसचेअरमन विविध कार्यकारी सोसायटी ,तंटामुक्ती समिती अध्यक्ष नितीन जाधव,ज्येष्ठ शिवसैनिक तानाजी रोडे ,शांताबाई बोऱ्हाडे संचालक विविध कार्यकारी सोसायटी ,वामनराव जाधव , संजीवन गाढवे , राजेंद्र शिंदे , रामदास जाधव ,अजित बोऱ्हाडे , संतोष फ जाधव ,अमोल गाढवे , देविदास करंजखेले , शामराव करंजखेले ,महेश कदम ,अंकुश बोऱ्हाडे , पोपट विधाटे , श्रीपत विधाटे , बाळासाहेब विधाटे , राहुल जाधव , सुजल विधाटे , किशोर विधाटे , गणपत भंडारकर , चंद्रकांत जाधव , माऊली मांडगे , तानाजी तांबे , निलेश करंजखेले , विक्रम बोऱ्हाडे , अमोल जाधव , रोहित भुमकर , रुपेश विधाटे , चंद्रकांत जाधव ,सावकार बढेकर व सर्व धामणी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .