हिंदुत्वाचा बुलंद आवाज म्हणून शिवसेनाप्रमुखांची जगभर ओळख!!

हिंदुत्वाचा बुलंद आवाज म्हणून शिवसेनाप्रमुखांची जगभर ओळख!!
आज दि.२३ मेंगडेवाडी (ता.आंबेगाव) येथे
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती साजरी करण्यात आली.यावेळी शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले
मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी पेटून उठत हिंदुत्वाची भगवी पताका फडकवत ठेवणारा बुलंद आवाज म्हणजे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे!!
आपल्या रोखठोक वक्तव्यांमुळे ते नेहमीच चर्चेत रहायचे. एकदा बोललेला शब्द त्यांनी कधी वापस घेतला नाही. त्यांनी पक्ष वाढवला, सत्तेत आणला आणि शेवटपर्यंत आपला झंझावात कायम ठेवला. त्या बाळासाहेब ठाकरे यांची आज गुरुवार २३ जानेवारी रोजी सर्वत्र जयंती साजरी होतीय.
बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांना न्याय मिळावा, यासाठी त्यांनी अनेक मुद्द्यांना वाचा फोडली. तसंच, ज्वलंत हिंदूत्वाचा त्यांनी कायम पुरस्कार केला. अंगावर भगवा कुर्ता, भगवी लुंगी, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, आणि सर्वांच्या लक्षात राहीला तो ठाकरी आवाज, हे खरं त्यांच चित्र होतं. त्यांच्या बोलण्यात जो ठाकरी बाणा होता तोच बाणा त्यांच्या जगण्यात आणि वागण्यात अखेरपर्यंत राहीला. बाळासाहेबांच वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी घेतलेली भूमिका कधी फिरविली नाही. आपल्या भूमिकेवर कायम ठाम राहणं, हा त्यांचा महत्वाचा पैलू!!
ते बोलतानाचं म्हणायचे,”माझे शब्द म्हणजे बंदुकीतली गोळी आहे. एकदा सुटली की सुटली. पुन्हा पाहायचं नाही कुठे पडली अन् कुणाला लागली”. असा एकंदरीत त्यांचा ठाकरी बाणा होता. असे युवासेना जिल्हा समन्वयक सुनील गवारी यांनी सांगितले.
यावेळी माजी उपसरपंच अंकुश मेंगडे, ग्रा.पं. सदस्य विशाल मेंगडे, चेअरमन साईनाथ मेंगडे, सूर्यकांत मेंगडे, श्री गणेश देवस्थान ट्रस्ट मा. उपाध्यक्ष भास्कर मेंगडे, युवा नेते अमोल मेंगडे, किसन बुवा मेंगडे, माऊली मेंगडे, अशोक दांगट, विठ्ठल मेंगडे, कान्हू टाव्हरे, विवेक मेंगडे व शिवसैनिक उपस्थित होते