काठापूर बु.(ता.आंबेगाव) ग्रामपंचायतीच्या वतीने महिलांसाठी आरोग्य शिबिर संपन्न!!

काठापूर बु.(ता.आंबेगाव) ग्रामपंचायतीच्या वतीने महिलांसाठी आरोग्य शिबिर संपन्न!!
काठापुर बुद्रुक ( ता.आंबेगाव) ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील महिलांच्या रक्तातील हिमोग्लोबिन, व्हाईट ब्लड सेल्स, प्लेटलेट आणि कॅल्शियम ची तपासणी शिबीर आयोजन केले होते.यात 140 महिलांनी सहभाग नोंदवला.
काठापुर बुद्रुक ग्रामपंचायतच्या वतीने पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून गावातील महिलांची आरोग्याच्या बाबतीत शिबिराचे आयोजन केले होते.या शिबीरात रक्तातील हिमोग्लोबिन, व्हाईट ब्लड सेल्स,प्लेटलेट, कॅल्शियम ची तपासणी करण्यात आली. महिलांचे आरोग्य चांगले राहावे याबद्दल डॉ. संकेत रोडे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी सरपंच अशोक करंडे,माजी उपसरपंच विशाल करंडे,पप्पु खुडे, ग्रामपंचायत अधिकारी सुवर्णा गोसावी, ग्रामपंचायत सदस्या विमल करंडे, शोभा जोरी,अर्चना जाधव तसेच बचत गटाच्या सुजाता करंडे,पुनम गांधी, सुनिता मैड,मंगेश करंडे, उपस्थित होते,यावेळी सर्वेस्टेप सोलुशनस सदभावना पॅथॉलॉजि लॅबचे सहकार्य लाभले.
गावातील बचत गटाच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांना या शिबिरासाठी उपस्थित रहावे म्हणून प्रयत्न केले.कोरोना नंतर महिलांचे आरोग्यविषयक जागृकता वाढली तरी ग्रामीण भागात अनेक वेळा महिला आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे ग्रामपंचायतीने हिमोग्लोबिन, व्हाईट ब्लड सेल्स, प्लेटलेट आणि कॅल्शियम तपासणी शिबीर आयोजित केले होते.