आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

अनोळखी लोकांकडून शिरदाळे घाटात वणवा लावण्याचा प्रयत्न!! मा.उपसरपंच मयुर सरडे यांची वनविभागाला पट्टे पाडण्याची मागणी

अनोळखी लोकांकडून शिरदाळे घाटात वणवा लावण्याचा प्रयत्न!!
मा.उपसरपंच मयुर सरडे यांची वनविभागाला पट्टे पाडण्याची मागणी

काल रात्री नऊच्या सुमारास शिरदाळे धामणी घाटात काही अज्ञात व्यक्तींनी वणवा लावण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच वेळी त्या ठिकाणावरून घरी जात असताना शिरदाळे गावचे मा.उपसरपंच मयुर सरडे यांच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यांनी हा वणवा विझवण्याचा प्रयत्न केला.परंतु रात्रीची वेळ आणि एकटा माणूस असल्याने विझवण्यासाठी साधन नव्हते. त्यांनी जवळच राहायला असलेल्या विक्रम बोऱ्हाडे यांना संपर्क करून पोते ओले करून आणायला सांगितले. विक्रम बोऱ्हाडे काहीच क्षणात त्या ठिकाणी आले आणि या दोघांनी हा वणवा विझवला आणि मोठा अनर्थ टळला.
अजून हिवाळा सुरू आहे.बरीच जनावरे रानात खाजगी क्षेत्रात चरायला जात असतात त्यामुळे हा वणवा जर भडकला असता तर मोठं नुकसान झाले असते.शिवाय जवळच वनविभागाचे क्षेत्र आहे त्या ठिकाणी अनेक झाडे जळून खाक झाली असती तसेच अनेक वन्यजीव यात मरण पावले असते परंतु प्रसंगावधान राखत या दोन तरुणांनी हे सामाजिक काम पार पाडले. धामणी वनक्षेत्राच्या वनपाल सोनल भालेराव यांनी याची माहिती घेऊन केलेल्या कार्याचे कौतुक केले. वणवावनव्यामध्ये गवत तर जळतेच परंतु तेथे असणारे छोटे मोठे कीटक पशुपक्षी हे ही आगीत जळून खाक होतात तसेच यामध्ये जर झाडांना आही लागली तर पशुपक्ष्यांची घरटेही नष्ट होतात त्यामुळे त्यामुळे निसर्गाचे व पर्यावरणाचे खूप नुकसान होते वन्य प्राण्यांचे आश्रयस्थान नष्ट होते तर यापुढे वनवा लावू नये त्यामुळे निसर्गाचे प्रचंड नुकसान होते असे आवाहन सोनल भालेराव वनपाल धामणी यांनी केले आहे.

समाजात अनेक अशी कृत्य करणारे लोक असतात परंतु अशी कृत्य करताना त्यांनी लक्ष्यात घ्यायला हवे की यामुळे अनेक मोठी नुकसान होत असतात. जनावरांचा खाजगी जागेत चराऊ रान,वनविभागात झाडे,वन्यजीव यांची मोठी हानी होत असते त्यामुळे असली कृत्य करू नका. शिवाय रात्रीची वेळ असताना आजारी असून देखील आमचे मित्र विक्रम बोऱ्हाडे या कामासाठी धावून आले त्यांचे पण धन्यवाद…
श्री.मयुर सरडे
(मा.उपसरपंच शिरदाळे)

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.