आरोग्य व शिक्षण

जारकरवाडी गावच्या शिरपेचात मानाचा तुरा!!.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जारकरवाडीच्या विद्यार्थिनींनी खो-खो स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक!!

जारकरवाडी गावच्या शिरपेचात मानाचा तुरा!!

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जारकरवाडीच्या विद्यार्थिनींनी खो-खो स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक!!

आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या जारकरवाडी गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. जारकरवाडी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थिनींनी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल बालेवाडी पुणे येथे पार पडलेल्या यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सवात संपन्न झालेल्या खो-खो स्पर्धेच्या लहान गटात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
त्यांच्या या कामगिरीबद्दल पंचक्रोशीतून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

विजयी खेळाडूंना अशोक लोखंडे सर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच तृप्ती जयराम लबडे या विद्यार्थिनीने लांब उडी(लहान गट मुली)स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला आहे.स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना मच्छिंद्र विठ्ठल काळे,अब्दुलरहिमान जलील इनामदार,गोरक्ष विष्णू उकिरडे,अजित निवृत्ती सोनवने,रेखा सुनील वळसे,अशोक म्हतारबा लोखंडे,गंगुबाई चिमाजी वळसे,वैजयंती अशोक लोखंडे या सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

जारकरवाडी गावातील ग्रामपंचायत प्रशासन पदाधिकारी,सर्व सहकारी संस्था पदाधिकारी,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष,उपाध्यक्ष,सेवाभावी संस्था, सहकारी सोसायटी व पदाधिकारी यांच्यावतीने सर्व खेळाडूंचे कौतुक करण्यात येत आहे.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.