राजकीय

परदेशी पाहुण्यांना पडली धामणी(ता.आंबेगाव) ची भुरळ!! ते आले, त्यांनी पाहिले, त्यांना गाव खुप आवडले!!

परदेशी पाहुण्यांना पडली धामणी ची भुरळ!!
ते आले, त्यांनी पाहिले, त्यांना गाव खुप आवडले!!

आंबेगाव तालुक्यातील पुर्व भागातील मोठ्या आणि आदर्श असणाऱ्या धामणी गावाला परदेशी अभ्यासकांनी दिली भेट. आज घोड नदी खोऱ्यातील पाणी प्रश्नाचा अभ्यास करणे या उद्देशाने ” द नेचर काँझरवंशी” (The Nature Conservanshi)या कंपनीच्या कमेटी ने धामणी गावाला भेट देऊन गावातील शेतीचा पाणीप्रश्न, रोजगार, भौगोलिक, ऐतिहासिक, शैक्षणिक, आरोग्याची माहिती घेतली.
“द नेचर कॉंझरवंशी” या कंपनीचे जगातील सत्तर देशात काम चालते.विविध देशातील पाणीप्रश्नावर अभ्यास करुन सरकार ला माहिती देऊन दुष्काळ परिस्थितीवर मात करायचा प्रयत्न केला जात आहे. पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेले यांचे बंधु राहुल करंजखेले यांच्या माध्यमातून ही कमेटी धामणी गावात आली होती.

या कमेटी मध्ये भारत, अमेरिका, कोलंबिया या देशातील प्रतिनिधींचा समावेश होता.
धामणी गावामधील गावठाणाची पाहणी केली. गावची पेठ दोन्ही बाजुची दुकाने घरे पाहुन परदेशी पाहुणे खुश झाले. विशेषतः जुने अत्यंत खोल असणारे आड पाहुन त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. जुने राममंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. ग्रामपंचायत ला भेट देऊन गावची सर्व माहिती घेतली.पोस्ट अॉफीस, जयहिंद वाचनालय ची त्यांनी माहिती घेतली. जि. प. शाळेच्या भेटीच्या वेळी त्यांनी शाळेचे फोटो काढले.स्वपिल तांबे यांच्या हॉटेल मधील कॉफी, भेळ, शेवरेवडी, वडापाव, जिलेबी वर ताव मारताना हे सर्व पदार्थ आम्हाला खुप आवडले अस परदेशी पाहुण्यांनी आवर्जून सांगितले. संपूर्ण गाव फिरुन झाल्यावर शेवटी त्यांनी शाळेजवळच्या ओढ्यावरील बंधाऱ्याला भेट दिली व त्यातील पाणी पातळी ची पाहणी केली.

शेवटी जाताना परदेशी पाहुण्यांनी गाव आणि गावकरी खुप चांगले आहेत. आम्हाला तुमचे गाव खुप खुप आवडले आम्ही पुन्हा नक्की येणार. विशेषतः आम्ही सर्व तरुण गावाविषयी एवढ्या प्रेमाने बोलत होतो याचे त्यांना खुप कौतुक वाटले. व तुम्ही सर्व असेच एकत्र काम करा असा सल्ला दिला.
या कमेटी मध्ये भारतातील गिरिजा गोडबोले, सीताराम शरणांगत, गार्गी जोशी, ज्ञानेश गानोरे, अमेरिकेचे ब्रूक ऍटवेल, न्यॉथन कॅरीज व कोलंबीयाचे जॉन गोंझालीज हे होते.

या पाहणी दौऱ्यात सरपंच रेश्माताई बोऱ्हाडे, मा. सरपंच सागर जाधव, उपसरपंच संतोष करंजखेले, ग्रामपंचायत सदस्य अक्षयराजे विधाटे, राहुल करंजखेले, अजित बोऱ्हाडे, अध्यक्ष संतोष पंचरास, पोस्टमन सुधाकर जाधव, सतिश पंचरास, अरुणा पंचरास, दिनेश जाधव उपस्थित होते.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.