आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

शिरदाळे घाटात अपघाताने लोखंडी कठडे वाकले!!

शिरदाळे घाटात अपघाताने लोखंडी कठडे वाकले!!

शिरदाळे,धामणी घाटात बसवण्यात आलेले लोखंडी कठडे अपघाताने वाकले आहेत. मंगळवारी झालेल्या अज्ञात वाहनांच्या अपघातात हा प्रकार घडला आहे. लोखंडी बॅरिगेट्स नसते तर भीषण अपघात झाला असता असे देखील त्या ठिकाणी पाहिले असता लक्षात येते. त्यामुळे घाटातील तीव्र उतार आणि वेडीवाकडी वळणे यामुळे अपघात वाढत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने शिरदाळे ग्रामपंचायतच्या मागणी वरून लोखंडी बॅरिगेट्स बसवले आहेत परंतु वाहनांची वर्दळ तसेच घाटाची तीव्रता लक्षात घेता या ठिकाणी मजबूत दगडी सिमेंट कठडे बांधावेत अशी मागणी शिरदाळे ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आली आहे. लवकरच एक पत्र तयार करून ते संबधीत विभागाला देण्यात येणार असल्याचे सरपंच सौ.जयश्री तांबे,उपसरपंच श्री.बिपीन चौधरी,मा.सरपंच वंदना तांबे,मा.उपसरपंच सुप्रिया तांबे यांनी सांगितले.
एक ते दीड किलोमीटर घाट रस्ता असल्याने सुरवातीलाच ” U” आकाराचे मोठे जाग्यावरती वळण आहे. त्यामुळे समोरून येणारी गाडी चालकाला दिसत नाही परिणामी अचानक गाडी समोर आल्याने अपघात होऊ शकतो. त्यामुळे रस्त्यावर दिशादर्शक व सूचना फलक लावणे देखील गरजेचे असून त्यामुळे अपघात कमी होण्यास मदत होईल असे मा.सरपंच मनोज तांबे,मा.उपसरपंच मयुर सरडे,गणेश तांबे यांनी सांगितले.
चौकट
या रस्स्यावर घाटात छोटे मोठे अपघात होत असतात. परंतु गेली काही दिवस रस्ता चांगला झाल्याने वाहतुकीमध्ये वाढ झाली आहे. लोखंडी बॅरिगेट्समुळे चांगला फायदा झाला आहे. परंतु वजनदार वाहने त्याला अडकू शकत नाहीत. त्यामुळे घाटाची तीव्रता लक्षात घेता जिथे गरज आहे तिथे दगडी सिमेंट कठडे बांधावेत अशी मागणी आम्ही ग्रामपंचायतच्या वतीने करत आहोत. त्याबाबतचा पत्रव्यवहार लवकरच संबंधित विभागाला केला जाईल.असे  शिरदाळे गावाचे मा.उपसरपंच मयूर सरडे यांनी पंचनामाशी बोलताना सांगितले

 

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.