आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव(खडकी) येथे २० कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या निधीतून अनेक विकासकामे काम प्रगतीपथावर !!

आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव(खडकी) येथे २० कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या निधीतून अनेक विकासकामे काम प्रगतीपथावर !!
———————————————————————
शिवसेना उपनेते, मा.खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव(खडकी) गावासाठी महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब व पुणे जिल्ह्याचे मा.पालकमंत्री मा.ना.चंद्रकांत दादा पाटील यांनी विविध विकासकामांसाठी कोट्यावधी रूपये निधी मंजुर केला होता.
सुरवातीच्या टप्प्यात १२.३८ कोटी रुपये निधीतून जल जीवन योजनेअंतर्गत अत्याधुनिक पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला होता. ह्या योजनेचे काम प्रगतीपथावर असून उर्वरीत विकासकामे देखील वेगाने सुरू होत आहेत.
आज युवासेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर व जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपभियंता ज्ञानेश्वर उभे यांनी देवराम तुकाराम चौक – मधला मळा – पोखरकर मळा रस्ता, लिंबाचा मळा अंतर्गत रस्ता, प्राथमिक आरोग्य केंद्र दुरूस्ती व आदर्श जिल्हा परिषद प्रथमिक शाळा सभाग्रह ह्या विकासकामांचा आढावा घेऊन संबंधित यंत्रणेला काही आवश्यक सूचना देखील केल्या.
यावेळी बोलताना सचिन बांगर म्हणाले की, माजी खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांच्या माध्यमातुन पिंपळगाव(खडकी) गावाला जलजीवन मिशन योजने अंतर्गत पाणीपुरवठा योजना, जिल्हा नियोजन समिती तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून गावातील महत्त्वाचे रस्ते, स्मशानभूमी, आरोग्य केंद्र, व्यायामशाळा, प्राथमिक शाळा वर्गखोल्या- सभागृह, अंगणवाडी ईमारती, दलित वस्ती सामाजिक सभागृह इत्यादी विकासकामांना जवळपास २० कोटी रूपयांपेक्षा अधिकचा निधी गावच्या इतिहासात पहिल्यांदाच मिळाल्याने गावात आनंदाचे वातावरण असून ही सर्व विकासकामे सूरू होत असल्यामुळे विकासकामांच्या दर्जावर स्थानिक वस्तीतील ग्रामस्थांनी लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचे सांगुन आगामी काळात ग्रामस्थांनी विकासाच्या पाठीमागे उभे रहा असे आवाहन केले.
पिंपळगाव(खडकी) येथे होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेतून अत्याधुनिक जलशुद्धीकरण प्रकल्प, घोडनदीपात्रात स्वतंत्र विहीर, जॅकवेल, पंपहाऊस, ३ ठिकाणी एकूण ५ लक्ष लिटर क्षमतेच्या उंच पाण्याच्या टाक्या, ३२ किलोमिटर परिसरात पाण्याची पाइपलाइन द्वारे ५५ लिटर प्रति मानसी शुद्ध पाणी पुरवठा नागरिकांना केला जाणार आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल बांगर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.