आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

या जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट, मुंबई हवामान विभागाचा शनिवारपर्यंत अतिवृष्टीचा इशारा!!

या जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट, मुंबई हवामान विभागाचा शनिवारपर्यंत अतिवृष्टीचा इशारा!!

हवामान विभाग व प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्यामार्फत पालघर जिल्ह्यात २० जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, पाऊस पडत असल्यास शक्यतो घराबाहेर पडू नये, तसेच दिलेल्या निर्देशांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख व पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी केले आहे.सोमवार, १८ जुलै रोजी तुरळक भागात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्याप्रमाणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. त्यानंतर मंगळवार व बुधवारी पावसाचे प्रमाण आणखी वाढेल आणि बहुतांश भागात जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल, असा इशारा देण्यात आला असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.रेड अलर्ट असलेल्या दिवशी जिल्ह्यातील नागरिकांनी पाऊस चालू असताना घराबाहेर जाणे टाळावे, घराबाहेर असाल तर झाडांचा आश्रय घेणे टाळावे, भरून वाहणाऱ्या नद्या, नाले, ओहोळ ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, अतिवृष्टीचा इशारा असताना पर्यटनस्थळी जाऊ नये, पावसात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास सोबत धातूच्या वस्तू घेऊन जाऊ नये, समुद्राला भरती असल्यास समुद्रकिनारी जाणे टाळावे, डोंगरदरीच्या कडेला जाऊन, समुद्रकिनारी सेल्फी काढण्याचा मोह टाळावा, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापनातर्फे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी नागरिकांना केले आहे.घरातील महत्त्वाची कागदपत्रे, नोटा, एटीएम कार्ड घरातील उंच ठिकाणी सुरक्षित ठेवावे, अफवांवर विश्वास ठेवू नये, सरकारच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापनातर्फे करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्याला इशारामुंबई हवामान विभागाने रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील ४८ तासांत जिल्ह्यात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पूरप्रवण आणि दरडग्रस्त गावांना सतर्कतेचीही सूचना दिली आहे. दुसरीकडे ठाणे जिल्ह्यात मंगळवारपासून जोरदार पाऊस सुरू आहे.

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.