आनंदाची बातमी: राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय; पुढील आठवडाभर या भागाला पाऊस झोडपून काढणार!
आनंदाची बातमी: राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय; पुढील आठवडाभर या भागाला पाऊस झोडपून काढणार!
कोकणासोबतच विदर्भातही पावसाचा जोर वाढला आहे. भारतीय हवामान विभागाच्या पूर्वानुमानानुसार राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने शेतकऱ्यांमध्ये काहीशी आशा निर्माण झाली आहे. राज्यात आत्तापर्यंतच्या अपेक्षित सरासरीच्या अजूनही १७ टक्के पाऊस कमी आहे. त्यामुळे या आठवड्यातल्या पावसाकडे अधिक लक्ष आहे. कोकणात आणि सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर बुधवारी तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. त्यामुळे या भागांमध्ये भारतीय हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे.कोकण विभागात या आठवडा अखेरीपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे. रायगड परिसरात मंगळवारीही पावसाचा जोर कायम होता. मंगळवारी दुपारी पावसाचा इशारा अद्ययावत करून रायगडसाठी रेड अलर्ट देण्यात आला. बुधवारसाठी पालघर, रायगड, पुणे, सातारा येथील घाट परिसरात तुरळक ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबईत दिवसभर पावसाची उपस्थिती-
मुंबई, ठाण्यातही सकाळच्या वेळेत मुसळधार पावसाची नोंद झाली. मुंबईत मंगळवार सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांमध्ये सांताक्रूझ येथे ११९, तर कुलाबा येथे १०६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दहिसर येथे ९३, राम मंदिर येथे ८२.५, चेंबूर येथे ७०.५, विद्याविहार येथे १०६.५, भायखळा येथे ८१, सीएसएमटी येथे १११, तर सायन येथे ९१ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. आज, बुधवारसाठीही मुंबईत ऑरेंज अलर्ट दिला आहे. ठाणे येथेही काही ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यात पूरस्थिती-
गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून दमदार बसरलेल्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पर्लकोटा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने भामरागडचा तालुक्याचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. नाल्यांवरील पुलांवर पाणी वाहत असल्याने १६ मार्ग बंद पडून सुमारे दीडशेहून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे.दरम्यान, चंद्रपूर शहरात मंगळवारी अवघ्या नऊ तासांत २४० मिमी पाऊस झाल्याने रस्ते जलमय झाले. अनेक दुकाने, घरांमध्ये पाणी शिरले. विदर्भासह कोकणातही पावसाचा जोर वाढला आहे. भारतीय हवामान विभागाच्या पूर्वानुमानानुसार राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय झाल्याने शेतकऱ्यांमध्ये काहीशी आशा निर्माण झाली आहे. राज्यात आतापर्यंतच्या अपेक्षित सरासरीच्या १७ टक्के पाऊस कमी आहे.