पंचनामाच्या खड्डयात गेले रस्ते!! या सदराची प्रशासनाने घेतली दखल!! खड्ड्यांच्या दुरुस्थीला झाली सुरुवात!!

पंचनामाच्या खड्डयात गेले रस्ते या सदराची प्रशासनाने घेतली दखल!!
खड्ड्यांच्या दुरुस्थीला झाली सुरुवात!!
पंचनामा टीम ने आंबेगाव, शिरूर तालुक्यातील रस्त्यांची झालेली दुरावस्था दाखवणारे खड्डयात गेले रस्ते हे सदर सूरू केले आहे.या सदरातून तालुक्यातील विविध रस्त्यांना प्रत्यक्ष भेट देऊन, त्यांची पाहणी करून झालेल्या दुरावस्थेची सचित्र माहिती प्रदर्शित केली होती. पंचनामाच्या या मोहिमेला यश येताना दिसत असून बहुतांशी रस्ते दुरुस्तीला प्रशासनाने सुरुवात केली आहे. या बाबत या परिसरातील लोकांनी व वाचकांनी टीम पंचनामा चे आभार मानले आहेत.
यापुढील काळात ही खड्डयात गेले रस्ते हे सदर सूरू ठेवले जाणार असून सर्वसामान्य लोकांच्या न्याय हक्कासाठी, समस्या सोडवण्यासाठी,त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी टीम पंचनामा सदैव प्रयत्नशील राहणार आहे.