आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खड्ड्यात हरवले रस्ते!! आजचा रस्ता आहे घोडेगाव – भीमाशंकर रस्ता!!

खड्ड्यात हरवले रस्ते!! आजचा रस्ता आहे घोडेगाव – भीमाशंकर रस्ता!!

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर!! सदाहरित जंगले, निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण करीत प्रदान केलेले नयनरम्य सृष्टीसौंदर्य, विविध प्रकारची फुलझाडे, प्राणी आणि पशू-पक्षी, शेखरू, भिमाशंकर मंदिर परिसर, मुक्तपणे संचार करणारी वानरे, जाताना लागणारे डिंभे धरण आणि त्या धरणाचा डोळ्यात न मावणारा अथांग असा जलाशय…. सगळ कस अगदी एखाद्या चित्रपटात शोभेल असेच!!

पण या सगळ्या गोष्टींना नजर लागतेय ती भिमाशंकर कडे जाणाऱ्या रस्त्याची!! घोडेगाव च्या पुढे गेल्या नंतर शिंदेवाडी पासून पुढे हा रस्ता खड्डेमय झाला आहे. सोबतीला दुतर्फा अनावश्यक झाडी-झुडुपे वाढली आहेत. ज्या मुळे अपघाताचा धोका वाढला आहे. डिंभे, शिनोली, पिंपळगाव (घोडे), पोखरी, राजपूर सह भिमाशंकर पर्यंत हा रस्ता खड्डेमय झाला आहे.

भिमाशंकर येथे देवदर्शन करण्यासाठी तसेच या परिसराचे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी, ट्रेकिंगसाठी, पक्षी निरीक्षण करण्यासाठी, येथील जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी, डिंभे धरण पाहण्यासाठी वर्षभर पर्यटक, अभ्यासक येत असतात. परंतु या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे.

या रस्त्यांची दुरवस्था लवकरात लवकर दुर करून प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा अशी अपेक्षा येथील रहिवासी, प्रवासी, वाहन चालक यांनी पंचनामाशी बोलताना व्यक्त केली.

 

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.