निरगुडसर येथील विद्यालयात मॅजिक बस इंडिया फौंडेशन व नेस्ले हेल्दी किड्स यांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन साजरा!!
निरगुडसर येथील विद्यालयात मॅजिक बस इंडिया फौंडेशन व नेस्ले हेल्दी किड्स यांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन साजरा!!
निरगुडसर (ता.आंबेगाव ) येथे पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालय येथे मॅजिक बस इंडिया फौंडेशन व नेस्ले हेल्दी किड्स यांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन साजरा करण्यात आला.
५ डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन म्हणून साजरा केला जातो.येथील विद्यालयात मॅजिक बस व नेस्ले हेल्दी किड्स यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन साजरा करण्यात आला.यामध्ये सुरवातीला विद्यार्थ्यांना विद्यालयाचे प्राचार्य कांताराम टाव्हरे यांनी मार्गदर्शन केले.
तसेच मॅजिक बस तर्फे वस्वयंसेवकांना समाजसेवेचे धडे देण्यात आले.त्यानंतर विद्यालयाचे विद्यार्थी उच्च माध्यमिक विद्यालयातील स्वयंसेवक व गावातील स्वयंसेवकांनी विद्यालयीन परिसर तसेच गावातील परिसर स्वच्छ करून कचऱ्याचे व्यस्थापन करत श्रमदान केले कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना सहभागी प्रमाणपत्र वाटण्यात आले.
उपक्रम राबविण्यासाठी विद्यालयाचे प्राचार्य कांताराम टाव्हरे, पर्यवेक्षक संतोष वळसे, प्रा. अरूण गोरडे,प्रा.श्वेता डोके, संपत पवार, कचरदास जाधव, दूंधा ढवळे, संजय गफले आदींचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच कार्यक्रम यशस्वीतेसाठी मॅजिक बसचे प्रतिनिधी पूजा गुंडाल,धनश्री सुर्वे ,शुभम मिसाळ आदींनी परिश्रम घेतले.या प्रसंगी संस्थेचे तालुका समन्वयक प्रवीण थोरात , रविंद्र शेळके आदी उपस्थित होते.
निरगुडसर (ता.आंबेगाव ) येथील विद्यालयात आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन साजरा करण्यात आला.