यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सवात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोबळेवाडी (जारकरवाडी) चे यश!!
यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सवात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोबळेवाडी (जारकरवाडी) चे यश!!
पारगाव (शिंगवे) केंद्र अंतर्गत काठापूर बुद्रुक येथे संपन्न झालेल्या यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव २०२४ – २५ या पारगाव केंद्रातील केंद्रस्तरीय स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोबळेवाडीने उत्तुंग यश संपादित केले आहे.
या स्पर्धा या काठापुर बुद्रुक या ठिकाणी दि.०५ डिसेंबर २०२४ ते ०६ डिसेंबर २०२४ रोजी संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये ढोबळेवाडी शाळेतील इयत्ता पहिली दुसरीच्या गटातील स्वराज सतीश ढोबळे या विद्यार्थ्यांने बेडूक उडी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला त्याची बीटस्तरीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली.
इयत्ता पहिली दुसरीच्या गटातील आराध्या दीपक ढोबळे हिने वेशभूषा या स्पर्धा प्रकारात तृतीय क्रमांक मिळवला.इयत्ता तिसरी चौथी या गटात जुई विकास ढोबळे या विद्यार्थिनीने लांब उडी या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला.इयत्ता तिसरी चौथीच्या गटातील लंगडी मुली या प्रकारात आपल्या ढोबळेवाडी शाळेचा तृतीय क्रमांक आला आहे. तसेच इयत्ता तिसरी चौथीचा गट कविता गायन या स्पर्धा प्रकारात तृतीय क्रमांक मिळालेला आहे.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे समस्त ग्रामस्थ ढोबळेवाडी,शालेय व्यवस्थापन समिती ढोबळेवाडी,शिक्षक पालक संघ ढोबळेवाडी,माता पालक संघ ढोबळेवाडी यांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले व पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.