समर्थ फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे कुस्ती स्पर्धेत यश!!
समर्थ फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे कुस्ती स्पर्धेत यश!!
डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे अंतर्गत बापूसाहेब शिवाजीराव देवरे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,धुळे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन विभागीय कुस्ती स्पर्धेत समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,बेल्हे या महाविद्यालयातील शरद नऱ्हे या विद्यार्थ्याने ६५ किलो वजनी गटामध्ये द्वितीय क्रमांक तर कल्याणी घोगरे हिने ५५ किलो वजनी गटामध्ये पावर लिफ्टिंग मध्ये द्वितीय क्रमांक संपादन केल्याची माहिती विभागप्रमुख डॉ.सचिन दातखिळे यांनी दिली.
सदर स्पर्धेसाठी पुणे,जळगाव, संभाजीनगर,सोलापूर,नागपूर,कोल्हापूर या सात जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील खेळाडू सहभागी झालेले होते.
समर्थ कुस्ती केंद्रामध्ये विद्यार्थ्यांना तज्ज्ञ मार्गदर्शकांचे वेळोवेळी प्रशिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांना वेगवेगळे कुस्तीचे डावपेच शिकविले जातात. कुस्तीमुळे आपले शरीर सुदृढ होते.सुदृढ शरीर आणि निरामय आरोग्य हेच यशाचे गमक असल्याचे यावेळी क्रीडा संचालक एचपी नरसुडे यांनी सांगितले.
या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक डॉ.राजाभाऊ ढोबळे, सुरेश काकडे,डॉ.सचिन भालेकर व मोनिका चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदिप गाडेकर तसेच संकुलातील सर्व प्राचार्य,विभागप्रमुख,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.