आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

आत्मा मालिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च येथे आचार्य चाणक्य कौशल विकास केंद्राचे उद्घाटन!!

आत्मा मालिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च येथे आचार्य चाणक्य कौशल विकास केंद्राचे उद्घाटन!!

शहापूर येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचलित शाखा मोहिली- अघई येथे आत्मा मालिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च (अम्रित) इथे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग ,महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत मंजुरी मिळालेल्या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे दूरदृश्य प्रणाली द्वारे उद्घाटन मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते पार पडले.

दि. 20 सप्टेंबर 2024 रोजी वर्धा येथे लाईव्ह पद्धतीने मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते उद्घाटन कार्यक्रम आयोजित केला होता व त्यातूनच इतर १००० संस्थांना दिलेल्या केंद्राचे उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने पंतप्रधानानी केले.आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजनेअंतर्गत भारतभरात १००० संस्थांना कौशल्य विकास केंद्र स्थापित करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे.

त्यानुसार शहापूरच्या विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टच्या आत्मा मालिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रीसर्च येथे आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजनेअंतर्गत वेब डिझायनर व सायबर सिक्युरिटी या दोन कोर्सेसला मान्यता मिळाली असून सदर कौशल्य विकास केंद्राचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्टी प्रणाली द्वारे उद्घाटन करण्यात आले सदर कौशल्य विकास केंद्राचा लाभ महाविद्यालयातील व तालुक्यांतील परिसरातील युवकांच्या कौशल्य विकास करण्यात होणार आहे जेणेकरून परिसराच्या,राज्याच्या , देशाच्याप्रगतीला संस्थेचा हातभार लागणार आहे .सदर कार्यक्रमाच्या दृकश्राव्य पद्धतीच्या उद्घाटना दरम्यान संकुलाचे कार्याध्यक्ष तथा विश्वस्त उमेश जाधव साहेब स्थानिक सदस्य अनंत गायकवाड , प्रवीण मोरे प्राचार्य डॉ.डी.डी. शिंदे, उपप्राचार्य गोविंद चव्हाण,कौशल्य विकास केंद्राचे संचालक सूर्यकांत नवले प्रा. नरेश शेंडे, अम्रित महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच संस्थेतील विविध शाळांचे प्राचार्य ,मॅनेजर व सदर योजनेखाली लाभ घेणारे लाभार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते. अम्रित महाविद्यालयात पंतप्रधान विश्वकर्मा योजना व मुंबई विद्यापीठाचे इंक्युबॅशन सेंटरही सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे.


सदर कौशल्य विकास केंद्र मिळवण्यास मोलाचे मार्गदर्शन करणारे संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी साहेब व कार्याध्यक्ष श्री उमेश जाधव साहेब यांनी परिसरातील विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कौशल्य विकासासाठी सदर केंद्राचा उपयोग करून घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
उत्तम पद्धतीचे व्यावसायिक शिक्षण देऊन तसेच केंद्र व राज्य सरकार द्वारे पुरस्कृत वेगवेगळ्या योजना राबवून परिसराचा ,राज्याचा व राष्ट्राच्या विकासात योगदान देण्यात अम्रित महाविद्यालय नेहमीच अग्रेसर राहील असे मत संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय उमेश जाधव साहेब यांनी यावेळी व्यक्त केले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.