आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

आंबेगाव पश्चिम भागातील पाटण खोरे परीसरातील चारा प्रश्न मार्गी!!

आंबेगाव पश्चिम भागातील पाटण खोरे परीसरातील चारा प्रश्न मार्गी!!

प्रतिनिधी- समीर गोरडे

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात म्हणजेच पाटण खोरे या भागात चारा टंचाईच्या दृष्टीने गाळपेरा क्षेत्रात पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १पाटण अंतर्गत पशुपालकांना मका बियाणे वाटप करण्यात आले,महाराष्ट्र राज्यात जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीत कमी पर्जन्यमान झालेल्या परिसरात 10 नोव्हेंबर 2023 रोजीच्या मंत्रिमंडळात बैठक घेऊन काही भाग दुष्काळ सदृश्य पर्जन्यमान म्हणून घोषित करण्यात आला व पश्चिम भागातील भविष्यात होणारे चारा टंचाई लक्षात घेता पशुसंवर्धन विभागाकडे गाळपेराक्षेत्र निश्चिती करून त्या काळात पशुधन विकास अधिकारी पाटण खोऱ्यात कार्यरत असलेल्या डॉक्टर पूजा बोंबले यांनी मका बियाण्यांची मागणी घेऊन गाळपेरा निश्चिती करून करून आठ गावातील शेतकऱ्यांची नावे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) डाँ.प्रशांत साळवे पंचायत समिती आंबेगाव यांच्याकडे सादर केली.

या भागात मागच्या वर्षी 9 ते 10 नोव्हेंबर रोजी अवकाळी वादळी पावसाने झालेले भात क्षेत्राचे नुकसान होऊन पावसाचे पाणी शेतात साचून जनावरांना खायला घालणारा भात पेंढा हा बहुतांश सडून गेला होता,यामुळे यावर्षी भागात जनावरांच्या चारा टंचाईचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो या बाबी लक्षात घेता गाळपेरासाठी मका बियाणे मोठ्या प्रमाणात शासनाच्या नियमानुसार प्राप्त करून पाटण अंतर्गत धरणालगत येणारी गावे म्हणजेच पाटण,महाळुंगे तर्फे आंबेगाव,कुशिरे खुर्द,बुद्रूक भोईरवाडी,दिगद,मेघोली,पिंपरी व साकेरी याआठ गावांमध्ये पशुपालकांना शंभर टक्के अनुदानावर 650किलो मका व 40किलो शुगर ग्रेन्ज वाटप करण्यात आले.

ज्यां शेतकर्याची शेती धरणालगत नाहीत त्यांच्याकडे जनावरे जास्त अशा पशुपालकांना देखील भात पेंढा रचून ठेवलेला असेल त्यावर निकृष्ट चारा सगळच करणे या प्रक्रियेबद्दल सुद्धा मार्गदर्शन करण्यात आले व प्रात्यक्षिक पशुपालकांना करून दाखवण्यात आले, जात 100 किलो असेल त्यावर दोन किलो गूळ ,एक किलो खनिज मिश्रण व मीठ 40 लिटर पाण्यामध्ये मी मिश्रण करून भात पेंड्यावर फवारून तो जनावरांना खायला द्यावा जेणेकरून पेंढा हा खायला मऊ व गुळामुळे एनर्जी व कॅल्शियम युक्त सकस सारा जनावरांना उन्हाळ्यात ताकद देईल व त्यामुळे पाण्याचे प्रमाण शरीरात राहील. वाटप केलेल्या क्षेत्रामध्ये चारा टंचाई न दिसून हिरवेगार मका जनावरांना पावसाळा चालू होईपर्यंत हिरवा चारा पुरेल अशी परिस्थिती यावर्षी पश्चिम भागात दिसत असुन जनावरांचे योग्य ती काळजी व जंत निर्मूलन व गोचीड निर्मूलन व लसीकरण या त्रीसूत्रींवर पशुधन विकास अधिकारी पाटण डाँ. पुजा बोंबले यांनी पशुपालकांना मार्गदर्शन केले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.