आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

डॉ.वैद्य गुंडोपंत सुतार यांना दुसऱ्यांदा डॉक्टरेट पदवी प्रदान!!

 

डॉ.वैद्य गुंडोपंत सुतार यांना दुसऱ्यांदा डॉक्टरेट पदवी प्रदान!!

डॉ. सुरेश राठोड: कोल्हापूर
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध निसर्गोपचार तज्ञ डॉ. वैद्य गुंडोपंत सुतार यांना फिलिपाईन्स देशातील यबर्रा विद्यापीठ यांच्याकडून मानद डॉक्टरेट पदवी प्रदान. सामाजिक, विज्ञान व आयुर्वेद क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन, डॉ झाल्दी कॅरेन डी लिओन जुनिअर-कुलगुरू युनिव्हर्सिटी ऑफ यबर्रा यांच्या स्वाक्षरीने प्रमाणित केलेली मानद डॉक्टरेट पदवी नुकत्याच झालेल्या गोवा-पणजी येथे डी.जे राठोड फाउंडेशन व डी.आय.डी गर्गिज फाउंडेशन च्या विशेष भव्य दिमागदार कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते ही पदवी प्रदान करण्यात आली.

वैद्य सुतार हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध निसर्गोपचार तज्ञ म्हणून ओळखले जातात, विज्ञानामध्ये प्राविण्य असणाऱ्या वैद्य सुतार यांना याआधीही इंडियन एम्पायर युनिव्हर्सिटीच्या युनिव्हर्सल डेव्हलपमेंट कौन्सिल कडून विज्ञान क्षेत्रातील मानद डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित करण्यात आले आहे. अनेक गरजूंना कोणताही गाजावाजा न करता मदत करणे हा त्यांचा स्वभाव आहे. त्यांनी कोरोनामध्येही अनेक रुग्णांना शासकीय रुग्णालयाच्या माध्यमातून मोफत उपचार उपलब्ध करून दिले आहेत. “देशाने मला काय दिले यापेक्षा मी देशाला काय देऊ शकतो हे विचार आचरणात आणल्यास देशाला कोणत्याही गोष्टींची कमतरता भासणार नाही, असे उद्गार डॉक्टर वैद्य गुंडोपंत सुतार यांनी यबर्रा विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्या दरम्यान काढले.

यावेळी, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, सोलापूर विद्यापीठ चे सहसचिव डॉ. शिवाजी शिंदे, पोलीस उपाधीक्षक सदानंद सदांशिव, गोवा राज्याच्या सेलिब्रिटी अमिता सलत्री, डॉ. वैद्य. गुंडूपंत सुतार, महाराष्ट्र पोलीस मित्र मुख्य कार्याध्यक्ष डॉ.सुरेश राठोड, कादंबरीकार डॉ श्रीकांत पाटील, डॉ. सुशील अग्रवाल, डॉ. मॅडी तामगावकर, सुतार यांचे कुटूंबीय, मित्रपरिवार तसेच अनेक राज्यातील लोक उपस्थित होते.

डॉ. वैद्य गुंडूपंत सुतार यांना डॉक्टरेट ही पदवी बहाल केल्यामुळे खऱ्या अर्थाने त्या पदवीचा मान सन्मान वाढल्याचंही कादंबरीकार डॉ श्रीकांत पाटील व अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.शिवाजी शिंदे यावेळी म्हणाले.

यावेळी डॉ. आनंद गिरी, मनोज शिंदे, डॉ. बी एन खरात, वैशाली झांजगे, युवराज मिरजकर, सारिका पाटील, कल्याणी निरुके, सविता पाटील, संजय पाटील, महाराष्ट्र पोलीस मित्र व गोव्यातील दर्शक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.