आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

पंचनामा विशेष लेखमाला – नाते कलेचे त्या रक्ताशी!! अष्टपैलू कलावंत श्री.उद्धवराव शंकरराव कोचुरे

आजचा साभार लेख -शाहीर खंदारे यांच्या लेखणीतून

महाराष्ट्रातील सुज्ञ, जानकार रसिक मायबाप…..
“नाते कलेचे त्या रक्ताशी” या लेखमालेचे आजचे आकर्षण…..खान्देश मधील नामवंत, अस्सल, हजरजबाबी, अफलातून सोंगाड्या ,विनोद जगलेले ,रसिकांना खळखळून हसविणारे विनोदसम्राट उध्दवराव शंकरराव कोचुरे,मु.पो.भिमनगर साकरी रोड धुळे ता.जि.धुळे होय .त्यांच्या आईचे नाव मीराबाई असून त्यांना तीन मुलं आहेत. वयाच्या दहाव्या वर्षापासून उध्दवरावांना कलेचे अ़ंग होते.घरचाच तमाशा असल्यामुळे, अंगात चांगलीच कला संचारली, माशाच्या पिल्लाला पोहणे शिकवावे लागत नाही.हि म्हण अगदी खरी ठरली.उध्दवराव जसे,जसे मोठे झाले तसे,तसे एक नामवंत सोंगाड्या म्हणून संपुर्ण महाराष्ट्रात नाव झळकले . काही दिवस वडिलांचा तमाशा शंकरराव कोचुरे या नावाने होता.ते वडिल वारल्यानंतर कै.शंकरराव कोचुरे यांचे चि.उद्धवराव कोचुरे या नावाने तमाशाफड काढला होता. नंतर उद्धवराव यांनी आनंद महाजन,(खान्देशचा कोहिनूर हिरा) भिका भीमा सांगवीकर, (कलाभूषण)मा .रघूवीर खेडकर ,भिमा नामा अंजाळेकर,रवी निकम धुळेकर इत्यादी नामवंत फडामध्ये काम करुन एक नंबरचे नाव करून विनोदी भूमिका पार पाडल्या आहेत.

तमाशात विनोद नसेल ,तर रसिक बसणार नाहीत, विनोद रसिकांना कार्यक्रमात हसवित बांधून ठेवतो.
हसण्यामुळे रसिकांना आनंदाचा लाभ होतो.हसणे तनमन स्वच्छ निर्मळ करते.रसिकांना तणावमुक्त करणारे उध्दवराव यांचेसारखे सोंगाडे म्हणजे तमाशा कलेचा अलंकार आहेत.
विनोदाचा अभ्यास आहोरात्र मा.उध्दवराव यांचे मनात चाललेला असतो.मा.उध्दवराव हे विनोदाची थंडगार सावली आहेत.ते कसलेले मुरब्बी विनोदाचे जाणकार आहेत.
कलावंत नविन पिढीने त्याचा आदर्श घ्यावा.हसणे सोपे ,विनोद सादर करणे अवघड असते.

मा.उध्दवराव यांनी ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक,धार्मिक, कौंटुबिक वगनाट्यात विनोदी भूमिका करून रसिकांची मने जिंकली.उद्धवराव स्टेजवर कधी येतील ही वाट रसिक बघतात.ते येताच टाळ्यांच्या व शिट्टयांच्या गजरात त्यांचे स्वागत करून, प्रेक्षकांमध्ये हास्याचे फवारे उडतात हे अगदी नक्की……

त्यांनी नाशिकेत अख्खान,राजा काळुसिंग,हसराज आणि बसराज,राजा चक्रधर,बंगाल देशाचा बुरा हलवाई,गंगाराणी,वेडा झालो तुझ्यासाठी,लेक चालली आळंदीला,कारगील चा संग्राम या वगनाट्या मध्ये वेगवेगळ्या भुमिका करुन रसिकांच्या मनावर ताबा मिळवून खान्देशातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात रसिकांच्या ओठांवर आपले नाव ठेवले यात शंकाच नाही…..

उद्धवरावांनी मा.भिमा आप्पा सांगवीकर,यदमाळ नाना,भिमा नामा,ह.भ.प.निवृत्तीबुवा कुरणकर, शिंणगारे मामा रोहिदास पठारे, बंदिस्त मास्तर, चिंतामण मास्तर इत्यादी महान कलावंताबरोबर काम करण्याची त्यांना संधी मिळाली हे त्यांचे नशीब समजतात.उध्दवरावांचे वय ६५वर्षाचे असून गेली ५५वर्ष आजही रसिकांची सेवा करीत आहेत.
तमाशा कलाविनोदवृल्ली उद्धव कोचूरे यांच्या कडुन, रसिकांची, रंगदेवतेची सेवा घडो, त्यांना उदंड आयुष्य मिळो,त्यांचे नाव महाराष्ट्रात झळकत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
लेखक
शाहीर खंदारे
ता.नेवासा
मो.८६०५५५८४३२

 

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.