आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

मा.पंचायत समिती सदस्य श्री.रविंद्र करंजखेले यांना धामणी गावचे मा.सरपंच श्री.सागर जाधव यांनी अभिनव पद्धतीने दिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

रविभाऊ करंजखेले(Rk) यांचा आज वाढदिवस ……. !!

वाढदिवस एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या असामान्य नेतृत्वाचा, कर्तृत्वाचा, दातृत्वाचा, आमच्यावर जिवापाड प्रेम करणार्‍या आपल्या नेत्याचा..

संत ज्ञानेश्वर महाराजांनी लहान वयात संपुर्ण जगाच्या शांततेसाठी पसायदान लिहिले आणि वयाच्या १६ व्या वर्षी संजीवन समाधी घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या ८व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. धर्मवीर संभाजी महाराजांनी १४ व्या वर्षी संस्कृत ग्रंथ लिहिला या सर्वांनी लहान वयात इतिहास घडवला आणि या सगळ्या संत आणि विरपुरुषांच्या विचारांनी प्रेरित होऊन रविभाऊ आपण आपल्या धामणी सारख्या मोठ्या गावचे वयाच्या १९व्या वर्षी सरपंच झालात. आणि इतिहास साक्षीला आहे की ज्यांनी लहान वयात पराक्रम केला त्यांनीच समाजाला योग्य दिशा द्यायचं काम केलं.. रविभाऊ तुम्हीसुद्धा रात्रंदिवस गोरगरीब जनतेसाठी आहोरात्र काम करताना, समाजाला न्याय हक्क मिळवुन देण्यासाठी तुमची होणारी तळमळ आम्ही सर्वांनी पाहीली आहे.

रविभाऊ आपला जन्म एका शेतकरी कुटुंबात झालात शिक्षणाची आवड असल्यामुळे पुण्याला ILS विधि महाविद्यालयात BSLपदवीपर्यंत शिक्षण घेतले. या शिक्षणाचा उपयोग तुम्ही सामाजिक आणि राजकीय जीवनात करुन समाजाला न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी केला.प्रशासनावर असलेला आपला अभ्यास पाहुन तर भलेभले तुम्हाला गुरू मानतात. आपण आपल्या धामणी सारख्या मोठ्या गावचे १९९७ साली वयाच्या १९ व्या वर्षी सरपंच होऊन आजपर्यंत तब्बल २०वर्ष आपले गाव आपल्या विचाराने काम करत आहे. आज धामणी, पहाडदरा, शिरदाळे या आपल्या गावामध्ये प्रत्येक घराघरात जिव्हाळ्याचे नातेसंबंध आपल्या कर्तुत्वाने आणि वक्तृत्वाने निर्माण केलेत.

हिंदुह्रदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी तुम्ही एवढ्या लहान वयात सरपंच झालात त्यावेळेस तुमच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकून आपल्याला दिलेला ‘खुप मोठा होशील’ हा दिलेला आशिर्वाद आपण खासदार शिवाजीराव आढळराव दादांच्या आणि अविनाश रहाणे साहेबांच्या साथीने आपल्या कार्याने सार्थ ठरवलात.गेले १५ वर्षे कार्यसम्राट खासदार शिवाजी दादांचे अत्यंत विश्वासु सहकारी म्हणुन संपूर्ण जिल्ह्य़ात तुमची ओळख आहे. आपण आपल्या पक्षात काम करत असताना आपल्या कामाच्या जोरावर सरपंच, उपतालुकाप्रमुख, तालुकाप्रमुख असताना आपण समाज्याच्या न्याय हक्कासाठी स्वताच्या जिवाची पर्वा न करता आंदोलन., उपोषण केले, सत्ताधाऱ्यांना आणि मुजोर आधिकाऱ्यांना जनतेच्या हितासाठी प्रसंगी घेराव घालण्यास आपण मागे पुढे पाहीलं नाही आपल्या कामाची दखल घेऊन पक्षाने तुम्हाला उपजिल्हाप्रमुख पदावर काम करण्याची संधी दिली. उपजिल्हाप्रमुख या मोठय़ा पदावरती प्रमाणीकपणे काम करुन आपल्या कामाचा ठसा उमटवला.

आपल वक्तृत्वाने तर हजारोंच्या सभा आपल्याशा करुन टाकल्या.काही दिवसांपूर्वी पंचायत समिती ची निवडणुक जाहिर झाली. त्यावेळेस पंचायत समिती उमेदवार म्हणुन भाऊ आपल्या नावाची चर्चा आंबेगाव तालुक्यात होऊ लागली आणि पंचायत समिती च्या निवडणुकीमध्ये आपण विरोधकांच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडून प्रचंड मताधिक्याने निवडून आलात हीच आपल्या कामाची पावती होती. तुमच्या मुळे लोणी धामणी नव्हे तर संपूर्ण आंबेगाव तालुक्यातील शिवसैनिक आणि सामान्य जनतेमध्ये एक नवचैतन्य पसरले.आणि सर्व सामान्य माणुस पंचायत समिती मध्ये मोठ्या आशेने जाऊ लागला.आपण त्या प्रत्येकाचे प्रश्न आपण सोडवून त्या प्रत्येकाच्या चेहर्यावरती आनंद देऊ लागला. वैयक्तिक लाभाच्या योजना येथुन मागे सर्व सामान्यांपर्यंत पोहचत नव्हत्या त्या आपण स्वतः त्या लोकांपर्यंत पोहोचवु लागले.

रविभाऊ तुमची खंडेराया वरती नितांत श्रद्धा आहे. तुम्ही लोणी धामणी सारख्या दुष्काळी भागाला आजपर्यंत विरोधकांनी ज्या म्हाळसाकांत योजनेच्या नावाखाली फसवलतं, त्याच मल्हारी म्हाळसाकांत खंडोबाचा आशिर्वाद घेऊन जलयुक्त शिवार योजना सरकारकडे पाठपुरावा करुन दुष्काळी भागाचा केलेला कायापालट पाहुन संपुर्ण जिल्हा तुमच्याकडे आशेने पहात आहे. आपण समाजाच्या न्याय हक्कासाठी वेळोवेळी आंदोलने उपोषण केलीत. आपली समाजासाठी काम करण्याची तळमळ खुप मोठी आहे.

रविभाऊ गेल्या काही दिवसांपूर्वी धामणी ग्रामपंचायत ची निवडणूक झाली त्यावेळेस थेट जनतेतून सरपंच होण्यासाठी आपण माझ्या सारख्या एका सामान्य कार्यकर्त्याच्या पाठिवर हात ठेवला आणि मला गावचे नेतृत्व करण्याची संधी दिली. मला वेळोवेळी मार्गदर्शन करण्याचे काम आपण करत आहात. मी राजकारणात किंवा समाजकारण जे करत आहे ते फक्त तुमच्यामुळे कारण तुम्ही मीच नव्हे तर धामणी आणि पंचक्रोशीतील अनेक तरुणांचे आदर्श आहात.
रविभाऊ तुमच्यासाठी देवाने एक सुत्रे बनवले आहे ते म्हणजे 12×365×7×24 जनतेची सेवाच करणे आणि आपण सुद्धा समाजकार्य करताना कोन कुठल्या पक्षाचा कुठल्याही समाजाचा याचा कधी विचार केला नाही. धामणी गावातील मातंग समाजातील हौसाबाई पंचरास आपल्याला मुलगा समजते त्याच्यावरून तुमच्या कामाची पोचपावती मिळते. कोळी समाजातील दशरथ कोळी, मारुती लोहार, शाकुबाई राऊत, सुदाम सोनवणे असतील हे आणि या सारखे अनेक गोरगरीब ज्याला कोनी नाही त्याला रविभाऊ असं एक सुत्रे तयार झाल आहे. त्या सर्वांना आपण जी मदत करत असता ते प्रत्येक धामणीकराने पाहिले आहे.

भाऊ आज आपला वाढदिवस माझ्यासारखा कार्यकर्त्यांच्या आनंदाचा दिवस आपणा विषयी लिहीण्यासारख खुप आहे परंतु,

आभाळाचा कागद केला आणि,
समुद्राची शाई केली तरी भाऊ तुमच्याविषयी लिहुन होणार नाही.

मी खुप मोठा नाही परंतु आपणावर प्रेम करणार्‍या माझ्यासारख्या अनेकांना जे वाटत ते मी लिहायचा प्रयत्न केला.

भाऊ आपणाला…..गणेशाची सिद्धी, चाणक्याची बुद्धी, शारदेच ज्ञान, कर्णाच दान, भिष्माच वचन, रामाची मर्यादा आणि हनुमंतरायाची शक्ती मिळो,आणि तुमच्या हातुन देव, देश, धर्म आणि आपल्या आई वडिलांची सेवा घडो.. अशी प्रार्थना मी कुलस्वामि खंडेरायाच्या आणि आई तुळजाभवानी च्या चरणी करतो…आणि आमच्या भाऊंना १०० वर्षाचं आयुष्य लाभो..

जय महाराष्ट्र……..

आपला निस्वार्थी कार्यकर्ता….
सागर सुनिलदादा जाधव पाटील……
मा.सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य धामणी………………..

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.