आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

करंजगावी आदर्श शिक्षिकेच्या निरोप समारंभात गहिवरले शाळकरी मुले!!

करंजगावी आदर्श शिक्षिकेच्या निरोप समारंभात गहिवरले शाळकरी मुले!!

करंजगावी जिल्हा परिषद शाळेतील आदर्श उपक्रमशिल शिक्षिका कल्पना बावकर (अंधारे) यांची तब्बल ९ वर्षाच्या सेवेनंतर आंतरजिल्हा बदली झाली आहे.

त्यांच्या बदलीनिमित्त करंजगावी आयोजित निरोप समारंभात जि.प शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थीनी प्रचंड गहिवरले होते. त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. अतिशय हृदयस्पर्शी सभारंभात या आदर्श उपक्रमशील शिक्षिकेनेही या शाळकरी मुलांच्या भावना लक्षात घेत गावकर्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करत निरोप घेतला. निःस्वार्थीपणे ज्ञानदानाचे कार्य करून संस्कारक्षम पिढी घडवणाऱ्या आदर्श शिक्षिका कल्पना बावकर (अंधारे) यांना विद्यार्थांसह गावकऱ्यांनी साश्रूनयनांनी निरोप देताना वातावरण भावूक झाले होते.

निरोप समारंभाचे अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष रोहिदास कामडे होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून व्यासपिठावर करंजगाव महाविकास आघाडीचे गटनेते, ग्रामपालिका सदस्य रावसाहेब पाटील राजोळे, मा.सभापती शहाजी राजोळे, मा.सरपंच खंडू बोडके पाटील, सागर जाधव, सरपंच नंदू निरभवणे, उपाध्यक्ष योगेश राजोळे, शिवाजी सोनवणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

शालेय समिती व ग्रामस्थांच्यावतीने यावेळी आदर्श शिक्षिका कल्पना बावकर (अंधारे) यांचा सत्कार करण्यात आला. तन्मय गोसावी, मनकर्निका राजोळे, गौरी शेलार, आरोही बोराडे, आरुश मोरे, रिया चव्हाण, साक्षी कोटकर, सूरज माळी या विद्यार्थ्यांनी शिक्षिकेविषयी मनोगत व्यक्त करत आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. शहाजी राजोळे, खंडू बोडके पाटील, नंदू राजोळे, राजेंद्र वलटे सर, प्रभाकर राठोड सर यांनीही यावेळी मनोगत व्यक्त करत कल्पना बावकर (अंधारे) यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी कल्पना बावकर यांनी अतिशय हृदयस्पर्शी मनोगत व्यक्त करत करंजगावकरांशी जुळलेली नाळ सदैव घट्ट राहणार असल्याचे सांगत सहकार्य करण्याऱ्या ग्रामस्थांचे आभार मानले.

यावेळी शुभेच्छा देताना माजी सरपंच खंडू बोडके पाटील म्हणाले की, आदर्श शिक्षिका पूरस्कारप्राप्त उपक्रमशिल शिक्षिका कल्पना बावकर (अंधारे) यांचे ज्ञानदानाचे कार्य कौतुकास्पद आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेवून बावकर मॅडम यांनी गेल्या ९ वर्षात शेकडो विद्यार्थी करंजगाव जिल्हा परिषद शाळेत घडविले. समर्पित भावनेने काम करणाऱ्या या उपक्रमशिल शिक्षिकेची उणीव करंजगाव शाळेला निश्चितच जाणवेल, असेही ते यावेळी म्हणाले. निरोप समारंभ कार्यक्रमास माजी सरपंच राजेंद्र राजोळे, नंदू राजोळे, शालेय समिती सदस्य योगेश बोराडे, देविदास मोरे, सुरेश गांगुर्डे, शिक्षक सुनील गांगुर्डे, वनिता गोसावी, अनिता गोसावी, रूपाली वाघले, शिल्पा आहेर मॅडम आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

करंजगाव जि.प शाळेतील आदर्श उपक्रमशील शिक्षिका कल्पना बावकर (अंधारे) यांचा सत्कार करताना गटनेते रावसाहेब पाटील राजोळे, खंडू बोडके पाटील, सरपंच नंदू निरभवणे व शालेय समिती पदाधिकारी.!

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.