आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

शिंगवे(ता.आंबेगाव )येथे वन्यप्राण्यांच्या हल्यात बिबट्या जखमी!!

शिंगवे(ता.आंबेगाव )येथे वन्यप्राण्यांच्या हल्यात बिबट्या जखमी!!

प्रतिनिधी – समीर गोरडे

शिंगवे (ता. आंबेगाव) येथे कासार मळा परीसरात दुपारी दोन वाजता सुमारास बिबट्याचा बछडा (वय अंदाजे एक वर्ष वयाचा )जखमी अवस्थेत आढळून आला.

शिंगवे कासार मळा येथील शेतकरी अनिल शिंदे दुपारी डाळिंबाच्या शेतात गेले असता शेतामध्ये बिबट्या जखमी अवस्थेत आढळून आला.

त्यांनी तात्काळ वनविभागाला कळविले असता वनपरीक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल प्रदीप कासारे, वनरक्षक शिवशरण मॅडम,प्रदिप औटी,वनकर्मचारी शरद जाधव,संपत भोर,रेक्कू मेंबर मनोज तळेकर,नविन सोनवणे, दत्ता राजगुरू,ऋषिकेश कोकणे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन जखमी बिबट्याला उपचारासाठी माणिकडोह येथे हलवण्यात आले असुन प्रकृती स्थिर असून उपचार सुरु आहेत.

बिबट्या नर जातीचा असून साधारण एक वर्ष वयाचा असून वन्यप्राण्यांच्या हल्यांत जखमी झाल्याचा अंदाज वनपाल शिंगवे प्रदिप कासारे यांनी वर्तवला आहे.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.